गोविंदाची राजकारणात एंट्री! ‘या’ मतदार संघातून निवडणूक लढवणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Actor Govinda joins ShivSena l चित्रपट अभिनेते गोविंदा यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. गोविंदाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. अशातच आता गोविंदा मुंबई उत्तर-पश्चिम मधून निवडणूक लढवू शकतात असे मानले जात आहे.

या कारणामुळे गोविंदाने राजकारणात केला प्रवेश :

काल रात्री अभिनेता गोविंदाने माजी आमदार कृष्णा हेगडे यांची देखील भेट घेतली होती. त्यामुळे अभिनेता गोविंदा हा शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत.

यावेळी कृष्णा हेगडे यांनी सांगितले की, अभिनेता गोविंदाला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असल्याने तो पक्षप्रवेश करत आहे. तसेच गोविंदाचा चेहरा आता वायव्य मुंबई लोकसभा जागेसाठी शिवसेनेकडून उतरवण्यात येणार असल्याची चर्चा रंगत आहे.

Actor Govinda joins ShivSena l उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणार :

मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून गोविंदाची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. अशातच त्याच मतदार संघातून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. उद्धव यांच्या या पावलानंतर काँग्रेस नेते निरुपम हेही संतापले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिली माहिती :

Actor Govinda joins ShivSena l मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “तळगाळाशी जोडलेल्या आणि सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या गोविंदाचे आज मी खऱ्या शिवसेनेत स्वागत करतो.” गोविंदा म्हणाला, “जय महाराष्ट्र… मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. मी 2004-09 पासून राजकारणात होतो. त्यातून बाहेर पडल्यानंतर मी परत येईन असे वाटले नव्हते. पण 2010-24 हे 14 वर्ष संपले. यानंतर मी पुन्हा शिंदेजींच्या रामराज्यात आलो आहे.

अशातच महाराष्ट्रातील एनडीएच्या जागांचे अंतिम वाटप अद्याप झालेले नाही. मात्र भाजप आणि अजित पवार यांनी उमेदवार जाहीर केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने अद्याप कोणालाही तिकीट दिलेले नाही. सूत्रांवर विश्वास ठेवला तर गोविंदाला तिकीट मिळणार हे निश्चित आहे.

News Title : Actor Govinda joins ShivSena

महत्त्वाच्या बातम्या :

ठरलं! मनसे लवरकच माहयुतीत सहभागी होणार? ‘या’ नेत्याकडून सर्वात मोठा खुलासा

…म्हणून उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर

पाकिस्तानी खेळाडूंचा ‘फिटनेस कॅम्प’, वर्ल्ड कपसाठी आर्मी स्कूलमध्ये सराव!

तुमच्या पतीला दीर्घायुष्य मिळण्यासाठी या सोमवती अमावस्येला या गोष्टी करा; तारीख व शुभ मुहूर्त

नवनीत राणांना उमेदवारी जाहीर होताच बच्चू कडूंचा इशारा, म्हणाले…