नवनीत राणांना उमेदवारी जाहीर होताच बच्चू कडूंचा इशारा, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bachchu Kadu | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 23 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने दोन टप्प्यात उमेदवारी जाहीर केली होती. पहिल्या यादीत 20 उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत तीन उमेदवारांची नावे होती. आता भाजपच्या तिसऱ्या यादीत नवनीत राणा यांचं एकमेव नाव आहे.

भाजपकडून खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नवनीत राणा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मात्र त्यांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांनी कडाडून विरोध केला आहे.

त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवत आक्रमक भूमिका घेतली आहे. उमेदवारी दिली म्हणजे विजय झाला असं होत नाही, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. त्यामुळे महायुतीच्या गोट्यात सध्या चिंतेचं वातावरण आहे. नवनीत राणा यांना बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांनी विरोध केला होता.

काय म्हणाले बच्चू कडू?

“नवनीत राणांना तिकिट दिलं ही भाजपची मर्जी आहे. उमेदवारी दिली म्हणजे विजय झाला असं होत नाही. आम्ही आमचं काम करु व्यवस्थित. उमेदवारी देऊन विजय मिळवता येतो का? तसं न झाल्यास चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देऊन नवनीत राणांना पाडता येतं का? हे आम्ही पाहणार आहोत. चांगला उमेदवार जो जिंकून येऊ शकतो अशा उमेदवाराचा शोध आम्हाला आहे.” असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, ज्यांनी आपल्या हातात भाजपचे झेंडे घेतले, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले अशा लोकांचा विचार करणं हे भाजपत संपलं आहे. रवी राणा यांनी भाजपाचं कार्यालय फोडलं होतं. भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण केली होती. आता काय वेळ आलीये यांच्यावर बघा. एवढी लाचारी कुणावर येऊ नये. याच रवी राणाचा जयजयकार कार्यकर्त्यांना करावा लागत असेल तर स्वाभिमान गेला आणि अभिमानही गेला, असा टोला बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भाजपला लगावला आहे.

“नवनीत राणांना पाडणं हे लक्ष्य”

रवी राणा घरात घुसून मारण्याची भाषा करतो, कुठेही गेलं तरी पैसे खायचे. आता बघू पैशात दम आहे की आमच्या प्रामाणिकपणात. स्वाभिमान पक्ष विकून भाजपच्या दावणीला आम्ही बांधला नाही. दिव्यांग मंत्रालयाचा शब्द दिला म्हणून मी गुवाहाटीला गेलो होतो. बाकी माझ्या मनात काहीही नव्हतं, असंही बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले आहेत. तसंच नवनीत राणांना पाडणं हे लक्ष्य असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

News Title : Bachchu Kadu on Navneet Rana

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई इंडियन्सचा खेळाडू क्वेना मफाका कोण आहे? वय ऐकून व्हाल थक्क

जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; कंपनीने आणला सर्वात स्वस्त प्लॅन

निता अंबानींचा क्रिकेटमधला इंटरेस्ट संपला, चाहत्यांनी घेतली मुंबईच्या मालकांची फिरकी

‘ती’ चूक मुंबई इंडियन्सला पडली महागात; नंतर ट्रेव्हिस हेड थांबलाच नाही!

Video: हार्दिक पांड्याला रोहितच्या चाहत्यांकडून पुन्हा एकदा दणका, हैदराबादमधील हे 3 व्हिडीओ एकदा पाहाच