MI चे पुढील 4 सामने वानखेडेवर! मुंबईत येण्यापूर्वी भारताच्या माजी खेळाडूचा हार्दिकला इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला असून जवळपाच सर्वच संघांनी आपले सुरुवातीचे 2 सामने खेळले आहेत. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळख असलेल्या मुंबईसाठी (Mumbai Indians) यंदाचा हंगाम म्हणजे एक वाईट स्वप्न म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. कारण मुंबईला आपल्या सलामीच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला. तर दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने विजय नोंदवला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील (Hardik Pandya) संघाला सलग 2 सामने गमवावे लागले. (IPL 2024 News)

मुंबई आता आपले पुढील चार सामने घरच्या मैदानावर अर्थात वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. 1 एप्रिलला मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना होणार आहे. तर दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध मुंबई आपल्या घरच्या मैदानावर दोन हात करेल.

मुंबईचा संघ मुंबईत येण्यापूर्वी भारताचा माजी खेळाडू मनोज तिवारीने हार्दिक पांड्याप्रती एक भीती व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, एक मुंबईचा चाहता म्हणून रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने चाहते नाराज आहेत. हार्दिकला यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अहमदाबादमध्ये चाहत्यांनी हार्दिकविरोधात घोषणाबाजी केली. मुंबईत हार्दिक पांड्या येईल तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणात चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागेल. तिवारी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी बोलत होता.

मुंबईचे पुढील 4 सामने –

मुंबई विरूद्ध राजस्थान (1 एप्रिल 2024)
मुंबई विरूद्ध दिल्ली (7 एप्रिल 2024)
मुंबई विरूद्ध आरसीबी (11 एप्रिल 2024)
मुंबई विरूद्ध चेन्नई (14 एप्रिल 2024)

मुंबईला आपले सुरुवातीचे दोन सामने गमवावे लागले आहेत. सलामीच्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दुसऱ्या सामन्यात हार्दिकसेनेचा सनरायझर्स हैदराबादने पराभव केला. हैदराबादच्या फलंदाजांनी जसप्रीत बुमराह वगळता मुंबईच्या सर्व गोलंदाजांची बेक्कार धुलाई झाली. मुंबईचा पुढील सामना आपल्या घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्ससोबत होणार आहे.

IPL 2024 चा थरार

दरम्यान, मुंबई इंडियन्सला आपल्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सलामीच्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुबंईला पराभवाची धूळ चारली तर बुधवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने विक्रमी धावसंख्या उभारून ऐतिहासिक विजय मिळवला. हैदराबादने निर्धारित 20 षटकांत 3 बाद तब्बल 277 धावा केल्या आणि या धावांचा बचाव करताना 31 धावांनी विजय साकारला.

News Title- next four IPL matches of Hardik Pandya-led Mumbai Indians will be played at the Wankhede Stadium in Mumbai
महत्त्वाच्या बातम्या –

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर ठाकरेंचा गंभीर आरोप!

हार्दिकच्या चुकीमुळे मुंबईला बसला मोठा फटका; ब्रेट लीने शेअर केला अनुभव

‘या’ दिग्गज कलाकारांनी अभिनयासोबतच राजकारणातही उमटवलाय विजयाचा ठसा!

मुंबईच्या संघात ‘राजकारण’! हार्दिक विरूद्ध रोहित ‘सामना’, खेळाडू विभागले

1 एप्रिलपासून बदलणार कर नियम; जाणून घ्या कोणते बदल होणार?