ठरलं! मनसे लवकरच महायुतीत सहभागी होणार? ‘या’ नेत्याकडून सर्वात मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raj Thackeray | राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठी उलथापालथ होत असताना दिसत आहे. एकीकडे लोकसभा निवडणूकीची तारीख जाहीर होऊन आठवडा झाला असला तरी मात्र, महायुतीमधील जागावाटप झाल्या नाहीयेत. तर दुसरीकडे मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे हे महायुतीसोबत जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे अचानक दिल्लीला गेल्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली. मात्र, राज ठाकरे खरंच शिंदे- फडणवीस- पवार या सरकारसोबत जाणार का? याकडे संपू्र्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असता, राहूल शेवाळे यांनी मोठा खुुलासा केला आहे.

काय म्हणाले राहुल शेवाळे?

दादर येथेल शिवाजीपार्कमध्ये आज शिवजंयतीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कार्यक्रमात उपस्थित होते. दरम्यान, या वेळी राहुल शेवाळे यांनी एक घोषणा केली. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्रच युतीची घोषणा करतील. इतकंच नाही तर राज ठाकरेंचं नेतृत्व तिन्ही पक्षांना मान्य असल्याचंही मोठं वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे.

पुढे ते म्हणाले की, “मनसे लवकरच महायुतीत सहभाग होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यासंदर्भातील निर्णयाची घोषणा करतील. पण आम्ही यापूर्वीच शिवसेनेच्या वतीने आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही मनसेचं स्वागत करतो. कारण मनसे हा शिवसेनेच्या विचारसरणीचा पक्ष आहे. हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचे (Raj Thackeray) आणि हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारा आहे.”

मनसे आल्यावर ताकद वाढेल –

माध्यमांशी बोलत असताना राहुल शेवाळे म्हणाले की, आम्ही याआधी राज ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये काम केलं आहे. जर मनसे महायुतीत आले तर आमची देखील ताकद वाढेल. असा विश्वास राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना आणि मनसे यांची विचारधारा एकच आहे, असं देखील शेवळे म्हणाले.

News Title :  raj thackeray ready to go with mahayuti

महत्त्वाच्या बातम्या-

MI चे पुढील 4 सामने वानखेडेवर! मुंबईत येण्यापूर्वी भारताच्या माजी खेळाडूचा हार्दिकला इशारा

आज RR विरुद्ध DC सामना रंगणार; अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11

या खेळाडूने मुंबई इंडियन्सला घाम फोडून पटकावली ऑरेंज कॅप; किंग कोहलीच काय?

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर ठाकरेंचा गंभीर आरोप!

हार्दिकच्या चुकीमुळे मुंबईला बसला मोठा फटका; ब्रेट लीने शेअर केला अनुभव