आढळराव दिसताच अमोल कोल्हेंनी हात पुढे केला, पाया पडले, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amol Kolhe Meet Adhalrao Patil | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. शिरूर मतदारसंघाकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. एकाबाजूला शिरूरचे विद्यामान खासदार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (Amol Kolhe Meet Adhalrao Patil) हे परस्परविरोधी लढणार आहेत. आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe Meet Adhalrao Patil) एकत्र दिसले आहेत. त्यांचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. शिवभक्त शिवनेरी गडावर जात शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होत आहेत. यामुळे खासदार अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील (Amol Kolhe Meet Adhalrao Patil) यांची शिवनेरी गडावर भेट झाली आहे. त्यांचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. यावेळी अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना वाकून नमस्कार केला आहे. यावेळी अमोल कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Amol Kolhe Meet Adhalrao Patil)

काय म्हणाले अमोल कोल्हे?

“दिल्लीच्या तख्तासमोर न झुकण्याची आणि स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून मिळते. कोणत्याही मंदीरात जाण्याआधी नतमस्तक झालो. ते शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीवर…पहिल्या पायरीचे दर्शन घेतल्यानंतर संघर्षाची प्रेरणा स्वाभिमानाची प्रेरणा मिळते. लढण्यासाठी ताकद द्या सर्वसामान्यांना लढण्याची प्रेरणा द्या. शिवनेरीवर नतमस्तक होताना मागितलं.” असं कोल्हे म्हणाले.

“भूमिकेत कुठं बदल झालाय?”

“आढळरावांची दिल्लीला कांदा उत्पादन शेतकऱ्यांसाठी वारी झाली असती तर समाधान वाटलं असतं. धोराणात्मक टीका व्हायला हवी होती. वैयक्तिक टीका, वैयक्तिक कामाविषयी टीका करणार नाही. पण धोरणात्मक टीका होणारच. समोरासमोर बसून चर्चा करू मी काय केलं ते बोलू. 2019 साली मी शरद पवार यांच्या आशीर्वादानं मी निवडणूक लढलो आणि आताही मी तेच करत आहे. माझ्या भूमिकेत कुठं बदल झालाय. शिरूरसह इतर मतदारसंघात ही मला लक्ष देता येतंय”, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

आढाळराव काय म्हणाले?

“अनेक वर्षांपासून मी तिथीनुसार आणि तारखेनुसार मी शिवजयंतीला शिवनेरी गटावर येतो. शिवरायांना नतमस्तक होतो. मी आज शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक झालो आणि प्राचाराची सुरूवात केली आहे. या पुढचं आयुष्य माझं शेतकऱ्यांच्या शेतमाला बाजारभाव मिळण्यासाठी कांद्याला आणि दुधाला बाजारभाव देण्यासाठी मी कटीबद्ध असणार”, असल्याचं आढळराव पाटील म्हणाले आहेत.

“मी शेतकऱ्याच्या कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांच्या वेदना मला माहिती आहेत. त्यांच्यासाठीच मी सध्या काम करत आहे”, असं शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले आहेत.

News Title – Amol Kolhe Adhalrao Patil Meet At Shivneri Fort

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या संघात ‘राजकारण’! हार्दिक विरूद्ध रोहित ‘सामना’, खेळाडू विभागले

1 एप्रिलपासून बदलणार कर नियम; जाणून घ्या कोणते बदल होणार?

तापमानात वाढ होणार; ‘या’ भागांना हवामान विभागाचा मोठा इशारा

हैदराबादच्या खेळाडूंची वादळी खेळी; तोडले कित्येक वर्षांचे रेकॉर्ड

मुंबई इंडियन्सचा खेळाडू क्वेना मफाका कोण आहे? वय ऐकून व्हाल थक्क