पाकिस्तानी खेळाडूंचा ‘फिटनेस कॅम्प’, वर्ल्ड कपसाठी आर्मी स्कूलमध्ये सराव!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pakistsan | आगामी काळात होणाऱ्या ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने पाकिस्तानने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. (Pakistan Cricket Board) गुरुवारी शेजारील देशातील खेळाडूंनी काकुल, अबोटाबाद येथील फिटनेस शिबिरात भाग घेत धावण्याचा सराव केला. याची झलक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केली आहे. खरं तर पाकिस्तानी खेळाडू आर्मी स्कूल ऑफ फिजिकल ट्रेनिंग येथे प्रशिक्षण घेत आहेत. पाकिस्तानी सैनिकांसोबत बाबर आझमसह पाकिस्तानचे इतर खेळाडू फिटनेसचे धडे घेताना दिसले.

खेळाडू तंदुरूस्त राहावेत यासाठी पाकिस्तान आर्मीच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत पाकिस्तानी संघ मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे. पण, या मालिकेत न्यूझीलंडचे वरिष्ठ खेळाडू दिसणार नाहीत. कारण ते आयपीएलमध्ये व्यग्र असल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकणार आहेत.

शेजाऱ्यांचा ‘भारी’ सराव

शेजाऱ्यांचा संघ आगामी काळात द्विपक्षीय मालिका खेळणार आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धची ट्वेंटी-20 मालिका आणि आगामी आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा समावेश आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक खेळवला जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) जून 2024 मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या तयारीला लागले आहे.

दरम्यान, भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकात झालेल्या दारूण पराभवानंतर शेजारील देशात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. बाबर आझमला कर्णधारपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. त्यानंतर पीसीबीने ट्वेंटी-20 संघाच्या कर्णधारपदाची धुरा शाहीन शाह आफ्रिदीच्या खांद्यावर सोपवली. तर कसोटी संघाचे नेतृत्व शान मसूदकडे देण्यात आले आहे.

 

Pakitsan चा संघ लागला कामाला

आता पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने काही मोठे निर्णय घेतले आहेत. अलीकडेच मोहम्मद हफिजच्या नेतृत्वातील निवड समिती बरखास्त करण्यात आली. त्याला हटवून सात सदस्यीय नवीन निवड समिती बनवण्यात आली आहे. या निवड समितीचा कोणीही अध्यक्ष नसेल आणि प्रत्येक सदस्याला समान अधिकार असतील असे बोर्डाने सांगितले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले इमाद वसिम आणि मोहम्मद आमिर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या जर्सीत दिसणार आहेत. बोर्डाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा माघारी दिला आहे. त्यामुळे हे दोघेही ट्वेंटी-20 विश्वचषकात दिसतील यात शंका नाही.

News Title- Pakistan cricket team players are training with Army
महत्त्वाच्या बातम्या –

तुमच्या पतीला दीर्घायुष्य मिळण्यासाठी या सोमवती अमावस्येला या गोष्टी करा; तारीख व शुभ मुहूर्त

नवनीत राणांना उमेदवारी जाहीर होताच बच्चू कडूंचा इशारा, म्हणाले…

MI चे पुढील 4 सामने वानखेडेवर! मुंबईत येण्यापूर्वी भारताच्या माजी खेळाडूचा हार्दिकला इशारा

आज RR विरुद्ध DC सामना रंगणार; अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11

या खेळाडूने मुंबई इंडियन्सला घाम फोडून पटकावली ऑरेंज कॅप; किंग कोहलीच काय?