काळजी घ्या! ‘या’ कारणामुळे दिवसेंदिवस महाराष्ट्र तापत आहे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | महाराष्ट्रात उन्हाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात उन्हाची चाहूल लागत आहे. सकाळपासून उष्ण वारे वाहत असल्याने दमटपणा वाढला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणंही अवघड झालं आहे. राज्यात काही ठिकाणी सकाळी आणि रात्री उष्ण हवा जाणवत आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्यास सांगितलं आहे. मात्र या मागचं कारण समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण?

राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा (Weather Update) पारा वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात 30 अंशाच्या पुढे पारा वाढल्याचं चित्र पहायला मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनूसार मार्चपासून मे पर्यंत मान्सूनपूर्व हंगाम महाराष्ट्रासाठी भौगोलिक रचनेनुसार वातावरणात एकाकी खूप बदल घडवून आणत असतो. एवढंच नव्हे तर कोकण किनारपट्टीला समुद्राचा खारा वारा कोकणपट्टीतील अधिवासासाठी दररोज आदळतो.

उष्णतेची लाट-

शिवाय, दिवसा व रात्री वाऱ्याची दिशा ही वेगळी असते. याच दरम्यान पाकिस्तान अफगाणिस्तान आणि राजस्थानच्या भागातून उच्च दाबाची प्रणाली झाली तर वायव्य दिशेकडून गुजरात, अरबी समुद्रावरुन वारे, उष्णता घेऊन मुंबईसह संपूर्ण कोकणात (Weather Update) सह्याद्रीवर अडकून आदळतात. त्यामुळे उष्णतेची जबरदस्त लाट मुंबईसह कोकणात महाराष्ट्राच्या इतर भागापेक्षा जाणवत असल्याचं हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी म्हटलं.

वारा खंडिता म्हणजे काय?

ज्यावेळेस पूर्व मोसमी मार्चपासून मे पर्यंत हंगामात दोन प्रति -चक्रीवादळे, अथवा प्रति-विवर्ते (अँटीसायक्लोन) किंवा उच्च हवेच्या दाबाचे डोंगर एक अरबी समुद्रात तर दुसरे बंगालच्या उप  सागरात किंवा किनारपट्टीच्या भू भागावर तयार होतात. तेव्हा या दोघांच्या मध्ये वाऱ्याची विसंगती (विंड डिसकंटीनुईटी ) तयार होते. म्हणजेच वारे एकमेकांच्या विरुद्ध महाराष्ट्रात तसेच देशाच्या मध्यावर वाहू लागतात. अरबी समुद्राच्या बाजूला उत्तरेकडून दक्षिणेकडे तर बंगालच्या उपसागराच्या बाजूला दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात. या दोघांमध्ये जी निर्वात पोकळी तयार होते तिलाच ‘वारा खंडितता (विंड डिसकंटीनुईटी ) म्हणतात.

News Title : weather update increase in climate

महत्त्वाच्या बातम्या-

“संजय किती खोटं बोलशील?, तुम्ही आमच्या…”, प्रकाश आंबेडकर भडकले

‘…म्हणून मी गुवाहाटीला गेलो होतो’; बच्चू कडूंचा मोठा खुलासा

संकष्टी चतुर्थीचा दिवस शुभ ठरणार की अशुभ?, वाचा राशीभविष्य

आढळराव आणि अमोल कोल्हे दिसले एकत्र, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

ठरलं! मनसे लवकरच महायुतीत सहभागी होणार? ‘या’ नेत्याकडून सर्वात मोठा खुलासा