‘…म्हणून मी गुवाहाटीला गेलो होतो’; बच्चू कडूंचा मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bachchu Kadu | अमरावतीमध्ये भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नवनीत राणा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मात्र त्यांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांनी कडाडून विरोध केला आहे.

याबाबत बोलताना बच्चू कडू यांनी गुवाहाटीबाबतही मोठा खुलासा केला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात गुवाहाटीची यात्रा मैलाचा दगड ठरला होता. याच ठिकाणी शिंदे गटातील 40 आमदारांनी बंड पुकारलं होतं. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार गुवाहाटीला गेले होते. यात बच्चू कडू यांचाही समावेश होता.

बच्चू कडू यांचा मोठा खुलासा

आज राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होण्यामागील सर्व प्लॅन हा गुवाहाटीमध्येच ठरला होता. तेव्हा ठाकरे गटासोबतच आज जे सत्तेत सामील झाले आहेत, म्हणजेच अजित पवार गटातील नेत्यांनी संताप व्यक्त केला होता. यावेळी खोक्यांचा मुद्दाही चांगलाच गाजला होता. गुवाहाटीला जाण्यासाठी आमदारांना खोके देण्यात आले, असा आरोप तेव्हा महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला होता. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश होता.

आज मात्र चित्र पालटलं आहे. आज अजित पवार गट शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सामील झाले आहेत. आता इतक्या महिन्यांनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी गुवाहाटीबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवली आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

रवी राणा घरात घुसून मारण्याची भाषा करतो, कुठेही गेलं तरी पैसे खायचे. आता बघू पैशात दम आहे की आमच्या प्रामाणिकपणात. स्वाभिमान पक्ष विकून भाजपच्या दावणीला आम्ही बांधला नाही. एकनाथ शिंदे यांनी मला दिव्यांग मंत्रालयाचा शब्द दिला म्हणून मी गुवाहाटीला गेलो होतो. बाकी माझ्या मनात काहीही नव्हतं, असा खुलासा बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केला आहे.

यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. “नवनीत राणांना तिकिट दिलं ही भाजपची मर्जी आहे. उमेदवारी दिली म्हणजे विजय झाला असं होत नाही. आम्ही आमचं काम करु व्यवस्थित. उमेदवारी देऊन विजय मिळवता येतो का? तसं न झाल्यास चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देऊन नवनीत राणांना पाडता येतं का? हे आम्ही पाहणार आहोत. चांगला उमेदवार जो जिंकून येऊ शकतो अशा उमेदवाराचा शोध आम्हाला आहे”, असं बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी म्हटलं आहे.

News Title : Big reveal of Bachchu Kadu

महत्त्वाच्या बातम्या-

पाकिस्तानी खेळाडूंचा ‘फिटनेस कॅम्प’, वर्ल्ड कपसाठी आर्मी स्कूलमध्ये सराव!

तुमच्या पतीला दीर्घायुष्य मिळण्यासाठी या सोमवती अमावस्येला या गोष्टी करा; तारीख व शुभ मुहूर्त

नवनीत राणांना उमेदवारी जाहीर होताच बच्चू कडूंचा इशारा, म्हणाले…

MI चे पुढील 4 सामने वानखेडेवर! मुंबईत येण्यापूर्वी भारताच्या माजी खेळाडूचा हार्दिकला इशारा

आज RR विरुद्ध DC सामना रंगणार; अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11