“संजय किती खोटं बोलशील?, तुम्ही आमच्या…”, प्रकाश आंबेडकर भडकले

Prakash Ambedkar Tweet | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. याआधी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार याबाबत अनेक बैठका झाल्या होत्या. काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांनी काही जागांवर दावा केला मात्र ते महाविकास आघाडीला मान्य नव्हते. यावरून आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीपासून लांब होत मोठा निर्णय घेतला आहे. (Prakash Ambedkar Tweet)

प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 30 मार्चपर्यंत थांबण्यास सांगितलं आहे. महाविकास आघाडीनं मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar Tweet) यांनी महाविकास आघाडी आणि संजय राऊत यांच्याविरोधात ट्वीट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

आम्हाला आघाडीमध्ये घेतलं आणि आम्हाला पाडण्याचा तुमचा प्रयत्न आहे. आम्हाला सामावून घ्यायचं होतं तर आपण आम्हाला बैठकीला का बोलवत नाहीत. आजही वंचित बहुजन आघाडीला न विचारता बैठक घेतली जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar Tweet) यांनी केला आहे.

काय आहे पोस्ट?

“संजय किती खोटं बोलशील? तुमचे आणि आमचे विचार एक आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर आपण आम्हाला बैठकीला का बोलवत नाही? फोर सीजन्स हॉटेमध्ये बैठक घेण्यात आली होती तेव्हा आमच्या कोणत्याच प्रतिनिधीला आमंत्रित केलं नाही? सहयोगी होऊन आपण आमच्याच पाठित खंजीर खुपसला. मला माहिती आहे की सिल्व्हर ओक येथे झालेल्या बैठकीमध्ये आपण आमच्याच विरोधामध्ये अकोल्यात उमेदवार उभा करण्याबाबत सांगितलं. हे कसलं नातं आहे. एकाबाजूला युती आणि दुसऱ्या बाजूला आमचा पराभव करण्याचं नियोजन,” असं ट्वीट प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar Tweet) यांनी केलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबतची युती तोडली आहे. त्यांनी नवीन प्लॅन तयार केला आहे. ते आता मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेत नवीन आघाडी तयार करणार आहेत. काही दिवसांआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीतून बाहेर जाण्यावर भाष्य केलं होतं. प्रकाश आंबेडकर यांनी सांगून जाणं गरजेचं होतं असं संजय राऊत म्हणाले. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत महाविकास आघाडी आणि संजय राऊत यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सध्या हे ट्वीट जोरदार व्हायरल होत असून त्याची सर्वत्र चर्चा आहे. ट्वीटमध्ये खंजीर खुपसणारा हात पाहायला मिळत आहे. त्यावर संजय राऊत असं लिहिलं आहे. तर ज्या व्यक्तीच्या पाठीत खंजीर खुपसला जात आहे ती व्यक्ती वंचित बहुजन आघाडी असल्याचं दिसतंय.

News Title – Prakash Ambedkar Tweet Against Sanjay Raut

महत्त्वाच्या बातम्या

आढळराव आणि अमोल कोल्हे दिसले एकत्र, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

ठरलं! मनसे लवकरच महायुतीत सहभागी होणार? ‘या’ नेत्याकडून सर्वात मोठा खुलासा

…म्हणून उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर

पाकिस्तानी खेळाडूंचा ‘फिटनेस कॅम्प’, वर्ल्ड कपसाठी आर्मी स्कूलमध्ये सराव!

तुमच्या पतीला दीर्घायुष्य मिळण्यासाठी या सोमवती अमावस्येला या गोष्टी करा; तारीख व शुभ मुहूर्त