अजित पवारांची लायकी काढणारे शिवतारे अचानक बॅकफूटवर; पवार-शिवतारेंचं मनोमिलन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vijay Shivtare And Ajit Pawar | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये काही प्रतिष्ठेचे मतदरासंघ आहेत. त्यांची जोरदार चर्चा आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे केवळ राज्याच्या नाहीतर देशाच्या नजरा खिळल्या आहेत. बारामती मतदारसंघावर विजय शिवतारे (Vijay Shivtare And Ajit Pawar) यांनी लोकसभा निवडणूक लढण्यावर आपली ठाम भूमिका बजावली होती. मात्र आता चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळत आहेत. (Vijay Shivtare And Ajit Pawar)

गेल्या अनेक दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. विजय शिवतारे बारामती मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांपासून फिरत होते. बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा आहे का?, असा सवाल देखील त्यांनी एका सभेमध्ये केला होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी 6 ते 7 तास थांबले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी समजोता केला होता. मात्र शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम होते.

 शिवतारे बॅकफूटवर

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर काल बैठक झाली यावेळी बैठकीसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विजय शिवतारे (Vijay Shivtare And Ajit Pawar) हे एकत्र आले होते. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि विजय शिवतारे (Vijay Shivtare And Ajit Pawar) यांच्यात वाद पाहायला मिळत होता. शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर अनेकदा टीका केली.


राजकारणामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. कट्टर मित्र कधी शत्रू होतील आणि शत्रू कधी कट्टर मित्र होतील याचा नेम नाही. असंच काहीसं वर्षा बंगल्याच्या कालच्या बैठकीमध्ये घडलं आहे. या बैठकीमध्ये विजय शिवतारे यांनी मवाळ भूमिका घेतली आहे.

अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती करत समजोता केला आहे. कट्टर विरोधक म्हणून अजित पवार आणि विजय शिवतारे यांची चर्चा आहे. मात्र आता बैठकीमुळे कट्टर विरोधक एकत्र आले आहेत. विजय शिवतारे हे माध्यमांशी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडतील. यामुळे बारामती मतदारसंघाबाबत विजय शिवतारे यांनी मवाळ भूमिका घेतल्याची चिन्हे आहेत.

बारामती लोकसभेच्या जागेवरून वाद

वर्षा बंगल्यावर बुधवारी झालेल्या बेठकीमध्ये आमदार भरत गोगावले देखील होते. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून वाद सुरू होता. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी निश्चित झाली. तर शरद पवार यांच्या कन्या आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यंदा देखील निवडणूक लढण्यास सज्ज झाल्या आहेत. अशातच विजय शिवतारे यांनी यामध्ये उडी घेत आपण देखील बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं.

अजित पवार आणि शरद पवार यांच्याविरोधामध्ये विजय शिवतारे यांनी टीका केली. पवार पर्व संपवण्यासाठी त्यांनी मतदारांना आपल्याला मत देण्यासाठी आवाहनही केलं. यामुळे महायुतीतील नेत्यांच्या डोकेदुखीत वाढ झाली होती. त्यानंतर कालच्या वर्षा बंगल्याच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर अजित पवार आणि विजय शिवतारे एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

News Title – Vijay Shivtare And Ajit Pawar Meet At Varsha Bunglow

महत्त्वाच्या बातम्या

तुमच्या पतीला दीर्घायुष्य मिळण्यासाठी या सोमवती अमावस्येला या गोष्टी करा; तारीख व शुभ मुहूर्त

नवनीत राणांना उमेदवारी जाहीर होताच बच्चू कडूंचा इशारा, म्हणाले…

MI चे पुढील 4 सामने वानखेडेवर! मुंबईत येण्यापूर्वी भारताच्या माजी खेळाडूचा हार्दिकला इशारा

आज RR विरुद्ध DC सामना रंगणार; अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11

या खेळाडूने मुंबई इंडियन्सला घाम फोडून पटकावली ऑरेंज कॅप; किंग कोहलीच काय?