मोठी बातमी! मंत्री दिलीप वळसे पाटील रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर!

Dilip Walse Patil | राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बडे नेते म्हणून दिलीप वळसे पाटील यांना ओळखलं जातं. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिलीप वळसे पाटील यांना पुण्यातील एक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रात्री लाईट सुरु करायला जात असताना वळसे पाटील खाली पडले, अशी माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनूसार (27 मार्च) रोजी रात्री, दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) घरी असताना रात्री अंधारात लाईट सुरु करायला जात होते या वेळेस ते पाय घसरुन पडले. वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. वळसे पाटील यांना हात, पाय आणि पाठीला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दिलीप वळसे पाटील पाय घसरुन पडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पण या घटनेमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. वळसे पाटील यांना तसा कोणताही धोका नाही. ते लवकरच बरे होतील, अशी माहिती समोर येत आहे.

डाॅक्टर काय म्हणाले?

दिलीप वळसे पाटील यांना पुण्यातील औंध येथील खासगी रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डाॅक्टरांनी वळसे पाटील यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. माध्यमांशी बोलत असताना डाॅक्टर म्हणाले की, पुढील 12 ते 15 दिवस त्यांच्यावर उपचार सुरु राहतील. वळसे पाटील यांच्यावरील सुरु असलेले उपचाराचे दिवस हे पाहता त्यांना दुखापत गंभीर झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

स्वतः दिली माहिती-

वळसे पाटील यांनी स्वतः आपल्या अधिकृत X अकाउंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. “काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल”, अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

News Title : dilip walse patil health update

महत्त्वाच्या बातम्या-

अजित पवारांची लायकी काढणारे शिवतारे अचानक बॅकफूटवर; पवार-शिवतारेंचं मनोमिलन

“संजय किती खोटं बोलशील?, तुम्ही आमच्या…”, प्रकाश आंबेडकर भडकले

‘…म्हणून मी गुवाहाटीला गेलो होतो’; बच्चू कडूंचा मोठा खुलासा

संकष्टी चतुर्थीचा दिवस शुभ ठरणार की अशुभ?, वाचा राशीभविष्य

आढळराव दिसताच अमोल कोल्हेंनी हात पुढे केला, पाया पडले, फोटो सोशल मीडियावर व्हायरल