सर्वात मोठी बातमी! पक्षाने तिकीट नाकारल्याने खासदारानं घेतलं विष

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MP Ganeshamoorthy | देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर अली आहे. पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून एका खासदाराने थेट विष प्राशन केलं. आज (28 मार्च) या खासदाराचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

तामीळनाडू येथील एमडीएमकेचे खासदार ए.गणेशमूर्ती यांनी तिकीट न मिळाल्याने टोकाचं पाऊल उचलत थेट रविवारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतांना आज चार दिवसांनंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

इरोडचे खासदार गणेशमूर्ती यांचं निधन

गणेशमूर्ती (MP Ganeshamoorthy) हे MDMK पक्षाचे इरोडचे खासदार होते. पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने ते नाराज झाले होते. यामुळे नैराश्यात गेल्याने त्यांनी किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

काही मिडिया रिपोर्टनुसार गणेशमूर्ती यांनी सल्फास हे किटकनाशक घेतल्याने त्यांची प्रकृती ही गंभीर झाली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर 74 व्या वर्षी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळे MDMK पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न

MDMK पक्ष तमिळनाडूमधील सत्ताधारी द्रविड मुनेत्र कळघम (DMK) सोबत युती करत आहे. दोन्ही पक्षांनी अलीकडेच एमडीएमकेचे सरचिटणीस वायको यांचा मुलगा दुराई वायको यांना इरोडमधून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे गणेशमूर्ती (MP Ganeshamoorthy) हे नाराज होते.

म्हणूनच त्यांनी रविवारी विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे. गणेशमूर्ती यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाच्या कारणामुळे सध्या एकच चर्चा रंगली आहे. या घटनेमुळे MDMK पक्ष चर्चेत आला आहे. गणेशमूर्ती यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला होता, याबाबत अधिकृत अशी माहिती समोर आली नाही. मात्र, काही रिपोर्टनुसार यामागे निवडणुकीचं तिकीट असल्याचं म्हटलं जातंय.

News Title : MDMK MP Ganeshamoorthy dies

महत्त्वाच्या बातम्या-

तुमच्या पतीला दीर्घायुष्य मिळण्यासाठी या सोमवती अमावस्येला या गोष्टी करा; तारीख व शुभ मुहूर्त

नवनीत राणांना उमेदवारी जाहीर होताच बच्चू कडूंचा इशारा, म्हणाले…

MI चे पुढील 4 सामने वानखेडेवर! मुंबईत येण्यापूर्वी भारताच्या माजी खेळाडूचा हार्दिकला इशारा

आज RR विरुद्ध DC सामना रंगणार; अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11

या खेळाडूने मुंबई इंडियन्सला घाम फोडून पटकावली ऑरेंज कॅप; किंग कोहलीच काय?