अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kangana Ranaut | अभिनेत्री कंगना रानौतला भाजपने हिमाचल प्रदेशमधईल मंडी येथून उमेदवारी दिली आहे. कंगना कायम वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. त्यामुळे अनेक वेळा नेटकरी सोशल मीडियावर कंगनाला प्रचंड ट्रोल करत असतात. दरम्यान, कंगनाने 2020 मध्ये बाॅलिवूड अभिनेत्री उर्मीला मातोंडकरवर जोरदार हल्लाबोल केला होता. उर्मीलाला तिने साॅफ्ट पाॅर्नस्टार म्हंटल्याने सगळीकडे एकच चर्चा सुरु होती. मात्र आता कंगना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पहायला मिळत आहे.

काय म्हणाली कंगना?

बाॅलिवूड अभिनेत्री उर्मीला मातोंडकर हिच्यावर कंगना रानौतने (Kangana Ranaut) निशाणा साधला होता. उर्मीलावर कंगनाने स्फाॅट पाॅर्न स्टार असल्याची आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावेळेस फार मोठा वाद देखील निर्माण झाला होता. मात्र, पुन्हा एकदा कंगनाने वादग्रस्त वक्तव्य केलं ज्यामुळे ती पुन्हा एकदा वादाच्या कचाट्यात सापडली आहे. कंगनाने आता तिच्या पॉर्न स्टारच्या वक्तव्यावरून स्पष्टीकरण देताना अभिनेत्री सनी लिओनीचा उल्लेख केला आहे.

लोकसभेचं तिकिट मिळाल्यानंतर कंगना (Kangana Ranaut) म्हणाली की, “भाजपचं तिकिट मिळवणं माझ्यासाठी कठीण नाही. उर्मिला सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. प्रत्येकाला माहिती आहे, ती तिच्या अभिनयामुळे नाही तर कोणत्या गोष्टीमुळे प्रसिद्ध आहे? जर तिला तिकिट मिळू शकतं, तर मला का नाही,” असं म्हणत कंगनाने उर्मीलावर हल्लाबोल केला.

स्फाॅट पाॅर्न हा आक्षेपार्ह शब्द?

एका मुलाखतीमध्ये बोलत असताना कंगना (Kangana Ranaut) म्हणाली की, स्फाॅट पॉर्न हा काय आक्षेपार्ह शब्द आहे का? हा शब्द असा आहे की, जो सामाजिक रुपात अस्वीकार्य आहे. आपल्या देशात पॉर्नस्टारचा जितका आदर केला जातो, तितका कोणाचाच केला जात नाही. सनी लिओनीला जाऊन विचारा.” कंगनाच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली आहे. नेटकऱ्यांनी कंगनाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

काँग्रेस नेते एकत्र-

दुसरीकडे कंगनाला उमेदवारी दिल्यानंतर एकमेकांशी भांडणारे काँग्रेसचे नेते एकत्र आले आहेत. इतकंच नव्हे तर हिमाचल प्रदेशातील दोन मोठ्या राजघराण्यांचीही कंगनाविरोधात छुपी एकजूट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

News Title : Kangana Ranaut gets troll

महत्त्वाच्या बातम्या-

‘निवडणूक लढवायला माझ्याकडे पैसे नाहीत’, निर्मला सीतारमण यांचं वक्तव्य चर्चेत

भन्साळींची बहुचर्चित ‘हीरामंडी’ सीरिज ‘या’ दिवशी होणार रिलीज!

गोविंदाची राजकारणात एंट्री! ‘या’ मतदार संघातून निवडणूक लढवणार

अदिती राव हैदरीने गुपचूप उरकलं लग्न?; ‘या’ अभिनेत्याशी थाटला संसार?

‘बाळासाहेबांना उसन्या भाटांची गरज पडली नाही’; अंबादास दानवे कडाडले