मोठी बातमी: नवनीत राणांनी दिला राजीनामा… राजीनामा देताना ढसाढसा रडल्या!

Navneet Rana Crying | आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. राज्याच्या राजकारणामध्ये अनेक ट्वीस्ट निर्माण होत आहेत. अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana Crying) यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली आहे. ही आनंदाची बातमी आहे. मात्र आता त्यानंतर राणा यांनी युवा स्वाभिमानी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना अश्रू (Navneet Rana Crying) अनावर झाले.

नवनीत राणा (Navneet Rana Crying) नेहमी कोणत्या न् कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या त्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आल्या आहेत. त्यांनी युवा स्वाभिमानी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्या युवा स्वाभिमानी पक्षाच्या कार्याध्यक्ष होत्या. त्यांनी पदाचा देखील राजीनामा दिला. यामुळे आता नवनीत राणा भावूक (Navneet Rana Crying) झाल्या आहेत. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलत असताना प्रतिक्रिया दिली आहे.

राजीनाम्यानंतर माध्यमांसोबत बातचीत

“एका छोट्या संघटनेला मोठ्या पक्षाचं रूप देणं. एक आमदार या पक्षाने घडवला. त्याच पक्षाने खासदार बनवलं. त्याच पक्षाने छोट्या कार्यकर्त्याला अमरावतीच्या खासदार म्हणून मोठी जबाबदारी दिली. अशा पक्षाचा राजीनामा देणं म्हणजे धाकधूक आहे. 12 -13 वर्षे काम केल्यानंतर त्याच पक्षाचा राजीनामा देताना ती भावना डोळ्यातून अश्रूंच्या माध्यमातून आली”, अशी प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली.

नवनीत राणांना उमेदवारी मिळू नये म्हणून…

नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू नये म्हणून महायुतीती घटक पक्षच्या नेत्यांनी विरोध केला होता. तसेच भाजपच्या काही नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तसेच शिंदे गटाच्या काही नेत्यांनी विरोध केला होता.

महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती या पक्षाला देखील उमेदवारी मिळू नये, अशी त्यांची भावना होती. अमरावतीच्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी केली होती, असं असतानाही भाजपने राणा यांना उमेदवारी जाहीर केली.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये नवीन ट्वीस्ट घडत आहे. नवनीत राणांनी घेतलेल्या निर्णयाकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. त्या रडत असलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

News Title – Navneet Rana Crying After Yuva Swabhimani Party Resign

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मंत्री दिलीप वळसे पाटील रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर!

अजित पवारांची लायकी काढणारे शिवतारे अचानक बॅकफूटवर; पवार-शिवतारेंचं मनोमिलन

“संजय किती खोटं बोलशील?, तुम्ही आमच्या…”, प्रकाश आंबेडकर भडकले

‘…म्हणून मी गुवाहाटीला गेलो होतो’; बच्चू कडूंचा मोठा खुलासा

संकष्टी चतुर्थीचा दिवस शुभ ठरणार की अशुभ?, वाचा राशीभविष्य