Women | अलिकडच्या काळात तरुणांमध्ये धूम्रपानाची क्रेज वाढत चालेली आहे. शाळेतील तरुण देखील व्यसनाच्या अहारी गेल्याचं आपण अनेक वेळा पाहतो. धूम्रपान दारु, गांजा याची तरुणांची दिवसेंदिवस क्रेज वाढत चालली आहे. मात्र याच बरोबर आता महिलेंचा देखील समावेश असल्याचं समोर आलं आहे. फक्त पुरुष नव्हे तर महिला देखील धूम्रपान करत असतात. दरम्यान, दिवसेंदिवस पुरुषांपेक्षा महिलांचा या गोष्टीकडे कल वाढत असल्याचं समोर आलं आहे. तणाव, कमी करण्यासाठी महिला धूम्रपान करत असल्याचं म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
पुरुषांमध्ये व्यसनाचं प्रमाण जास्त असलं तरी स्त्रिया (Women) देखील व्यसनी होत आहेत. विशेषतः शहरातील महिला किंवा तरुणींमध्ये याबद्दल जास्त कल वाढत चालला आहे. तरुणी देखील व्यसनी होत असताना दिसत आहेत. ऑफिसचं किंवा घरातील तणाव कमी करण्यासाठी महिला देखील मोठ्या प्रमाणात धूम्रपान करत आहेत. मात्र याचा अत्यंत वाईट परिणाम महिलांच्या शरीरावर होणार असल्याचं म्हटलं आहे.
धूम्रपान महिलांसाठी घातक?
धूम्रपान किंवा दारू महिलांसाठी (Women) घातक ठरु शकतं. या मागचं कारण म्हणजे, धूम्रपान किंवा दारु प्यायल्याने महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो. धूम्रपान आणि दारूच्या सेवनामुळे महिलांना कॅन्सरचा धोका हा असतोच, पण तो शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही मारून टाकतो. दरम्यान समोर अलेल्या माहितीनूसार एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
महिला (Women) या पुरुषांच्या तुलनेत अधिक धूम्रपान करतात, असं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. धूम्रपान ही एक अशी सवय आहे की जी सुटणे फार कठीण आहे. या संशोधनानुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांना धूम्रपानाची जडलेली सवय सोडवणं कठीण जात आहे.
महिला लठ्ठ होत आहेत-
पुरुषांपेक्षा महिलांचा व्यसनाकडे कल जात आहे. महिला व्यसानांमुळे लठ्ठ होत असल्याचं म्हटलं आहे. महिलांच्या लठ्ठपणाचे प्रमाण हे 27 टक्के आहे, तर 25 टक्के पुरुषांना धूम्रपानामुळे लठ्ठपणाला सामोरे जावे लागत आहे.
News Title : women avoid taking nicotine
महत्त्वाच्या बातम्या-
CBI चा राष्ट्रवादीच्या नेत्याला मोठा दिलासा; 840 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी क्लीनचिट
मोठी बातमी: नवनीत राणांनी दिला राजीनामा… राजीनामा देताना ढसाढसा रडल्या!
अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; ‘त्या’ वक्तव्याने खळबळ
सर्वात मोठी बातमी! पक्षाने तिकीट नाकारल्याने खासदारानं घेतलं विष
‘निवडणूक लढवायला माझ्याकडे पैसे नाहीत’, निर्मला सीतारमण यांचं वक्तव्य चर्चेत