Hardik Pandya सारखा का धरतो स्वतःच्या गोलंदाजीचा आग्रह?, T20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hardik Pandya | मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या चांगलाच चर्चेत आहे. IPL 2024च्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हार्दिक ज्या गुजरात संघातून परत आला त्या गुजरातने (Gujrat Titans) पहिल्या सामन्यात मुंबईला पराभवाची धूळ चारली. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) मुंबईची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढत मुंबईच्या माथी दुसरा पराभव दिला. या साऱ्या घटनाक्रमात एक गोष्ट घडली ती म्हणजे हार्दिक पांड्या मोठ्या प्रमाणात ट्रोल होऊ लागला.

रोहितचं कर्णधारपद काढल्याने आधीच नाराज-

रोहित शर्मा (Rohit Sharma) हा मुंबई इंडियन्सच्या प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत. रोहित शिवाय मुंबई इंडियन्सची कल्पना कोणत्याही चाहत्याने केली नसेल मात्र मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने अचानक हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याचा निर्णय घेतला. अर्थातच मुंबईच्या चाहत्यांना (Mumbai Indian Fans) हा बदल पटला नाही. सोशल मीडियातून तसेच जमिनीवर सुद्धा चाहत्यांनी या निर्णयाला मोठा विरोध केला, मात्र मुंबईच्या संघ व्यवस्थापनाने संघाच्या भविष्याचा विचार सांगून हा निर्णय रेटून नेला.

संघ व्यवस्थापनानं जरी निर्णय रेटला असला तरी मुंबईचे प्रेक्षक आयपीएल सुरु झाल्यावर या निर्णयाला कसा प्रतिसाद देतात?, याची सर्वांना उत्सुकता लागली होती. अखेर गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात याची झलक पहायला मिळाली. हार्दिक पांड्याला मुंबईच्या चाहत्यांनी मैदानातच मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं, त्यात या सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागल्याने हा विरोध आणखीनच तीव्र झाला. दुसऱ्या सामन्यात सुद्धा याच प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याने हार्दिकचं टेन्शन वाढलं आहे, अशातच आता एक नवीन माहिती समोर आली आहे.

IPL 2024

गुजरातनं हार्दिकची गोलंदाजी चोपून काढली-

IPL 2024चा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा पहिलाच सामना आणि मुंबईकडून पहिलं षटक टाकण्यासाठी आला तो हार्दिक पांड्या…. हार्दिक पांड्या पहिलं षटक टाकणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. संघात स्टार गोलंदाजांचा भरणा असताना एक ऑलराऊंडर खेळाडू पहिलं षटक टाक होता. हार्दिकच कर्णधार असल्याने अर्थातच त्याचा हा निर्णय होता. धक्कादायक बाब म्हणजे षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वृद्धिमान साहाने हार्दिकचं चौकार मारुन स्वागत केलं आणि या षटकात हार्दिकने तब्बल 11 धावा दिल्या.

गोलंदाज म्हणून या सामन्यात हार्दिक पांड्याला अजिबात चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने टाकलेल्या तीन षटकांमध्ये गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी तुफान धावा चोपल्या. हार्दिकने या सामन्यात एकूण 3 षटकं टाकली आणि या तिन्ही षटकांमध्ये हार्दिकला 30 धावा मोजाव्या लागल्या. एकूणच अत्यंत खराब गोलंदाजीचं प्रदर्शन त्याच्याकडून झालं.

सनरायझर्स हैदराबादनंही हार्दिक पांड्याला धुतला-

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध हार्दिक पांड्याने स्वतःला पहिलं षटक देण्याची चूक केली नाही, मात्र या सामन्यात त्याने दुसरं षटक स्वतः टाकलं. या सामन्यातही हैदराबादच्या फलंदाजांनी हार्दिकच्या गोलंदाजीची पिसं काढली. हार्दिकने टाकलेल्या 4 षटकांमध्ये त्याला 46 धावा मोजाव्या लागल्या.

SRHvMI Hardik Pandya Rohit Sharma

हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी एवढा आक्रमक का?

IPL 2024च्या दोन्ही सामन्यांचा नीट अभ्यास केला तर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गोलंदाजी करण्यासाठी जास्तच आक्रमक झाल्याचं दिसतंय. तसा तो ऑलराऊंडर खेळाडू असल्याने त्याने गोलंदाजी करण्यावर कुणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. मात्र वरच्या क्रमांकावर येऊन तो ज्या पद्धतीने गोलंदाजीचं नेतृत्त्व करताना दिसत आहे, त्यातून तो एकप्रकारे गोलंदाजीत स्वतःचा ठसा अधिक प्रभावीपणे वटवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे. यामागच्या कारणाची आता दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.

हार्दिक पांड्या भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर या प्रकारात मोडतो आणि या प्रकारात सध्या स्पर्धा तीव्र होताना पहायला मिळत आहे. त्यातच चेन्नई सुपर किंग्स संघातून खेळणारा ऑलराऊंडर शिवम दुबेची (Shivam Dube vs Hardik Pandya) गेल्या काही दिवसातील कामगिरी पाहता तो हार्दिक पांड्याला जोरदार प्रतिस्पर्धा करताना दिसू शकतो. दुबेच्या गोलंदाजीला सुद्धा चांगलीच धार आहे, त्यातच त्याने आयपीएलच्या आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये केलेली कामगिरी पाहता हार्दिकसाठी ही धोक्याची घंटा आहे.

शिवम दुबे तसेच या प्रकारात मोडणाऱ्या इतर खेळाडूंमुळे हार्दिकचं भारतीय संघातील (Team India) स्थान सुद्धा जाऊ शकतं. त्यामुळे हार्दिक पांड्या आपली गोलंदाजी किती प्रभावी आहे?, हे दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. असं असलं तरी त्याचे हे प्रयत्न सध्या तरी निष्प्रभ होताना दिसत आहेत. त्यामुळे हार्दिकच्या गोलंदाजीमागच्या गोष्टी आता चर्चिल्या जाऊ लागल्या आहेत.

-ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली तर तुमच्या मित्रांना तसेच WhatsApp ग्रुपवर शेअर करा

News Title: Mumbai Indians Hardik Pandya Bowling Secrets reveal

महत्त्वाच्या बातम्या-

राजीनामा देताना नवनीत राणा ढसाढसा रडल्या!

अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

सर्वात मोठी बातमी! पक्षाने तिकीट नाकारल्याने खासदारानं घेतलं विष

‘निवडणूक लढवायला माझ्याकडे पैसे नाहीत’, निर्मला सीतारमण यांचं वक्तव्य चर्चेत

भन्साळींची बहुचर्चित ‘हीरामंडी’ सीरिज ‘या’ दिवशी होणार रिलीज!