‘राम सातपुते खोट्या गरिबीचा…’; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Praniti Shinde | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची सभा झाली. त्यासभेला पदाधिकाऱ्यांनी संबोधित केलं. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी देखील या सभेला बोलत असताना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजप आणि राम सातपुतेंचा पुन्हा एकदा समाचार घेतला आहे.

माळशिरसचे आमदार भाजप नेते राम सातपुते यांच्यावर प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी काही दिवसांआधीच ट्वीटच्या माध्यमातून पद्धतशीर समाचार घेतला होता. राम सातपुते यांनी सुशिलकुमार यांच्याबाबत वक्तव्य केलं. त्यावर प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी माझ्यावर बोला. उमेदवार मी आहे. मग माझ्यावर बोलायचं, वडिलांवर बोलणारे तुम्ही कोण लागून गेलात?, अशा कडक शब्दात प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी सातपुतेंना सुनावलं आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी सभेत बोलत असताना त्यांनी सातपुतेंवर टीकेची तोफ डागली आहे.

भाजप सोलापूरकरांना गेल्या 10 वर्षांपासून फसवत आलंय. त्यांनी विश्वासघात केला आहे. आपल्याला भाजपच्या विरोधात लढायचं आहे. त्यांच्या विचारधारेच्या विरोधामध्ये लढायचं आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत. तसेच त्यांनी पुन्हा एकदा राम सातपुते यांना धारेवर धरलं आहे.

प्रणिती शिंदेंचं सातपुतेंना आव्हान

तुम्ही आमच्या बाबांच्या संघर्षाचं सांगता. बाहेरून येऊन तुम्ही आम्हाला पावती द्यायची नाही. तुम्ही कोण लागून गेलात माझ्या बाबांचा आपमान करायला? उमेदवार मी आहे तुम्ही माझ्यावर बोला, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.

‘अब राजा का बेटा राजा बनेगा’, ‘जो काबील है वही राजा बनेगा’ असं राम सातपुते म्हणाले होते. त्यावर प्रणिती शिंदे यांनी सुनावलं आहे. त्या म्हणाल्या की, “राम सातपुते नेहमी आपल्या खोट्या गरीबीचा दाखला देतात. सोलापूरमध्ये लोकहितांच्या केलेल्या कामांवर लोकांना ठरवूदे. काबिल कोण आहे…,” असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

“हिंमत असेल तर माझ्याशी लढा”

“विरोधक शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदेसाहेब यांच्यावर टीका करत आहेत. मी उमेदवार आहे मग विरोधकांनी माझ्यावर टीका कराव्यात. माझ्या वडिलांवर कशाला टीका करत आहात. हिंमत असेल तर माझ्याशी लढा”, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.

News Title – Praniti Shinde Aggressive On BJP And Ram Satpute

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

सर्वात मोठी बातमी! पक्षाने तिकीट नाकारल्याने खासदारानं घेतलं विष

‘निवडणूक लढवायला माझ्याकडे पैसे नाहीत’, निर्मला सीतारमण यांचं वक्तव्य चर्चेत

भन्साळींची बहुचर्चित ‘हीरामंडी’ सीरिज ‘या’ दिवशी होणार रिलीज!

गोविंदाची राजकारणात एंट्री! ‘या’ मतदार संघातून निवडणूक लढवणार