हार्दिक पांड्यामुळे मुंबई इंडियन्सवर लज्जास्पद विक्रमाची नोंद

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hardik Pandya | सध्या देशामध्ये आयपीएल सुरू आहे. क्रिकेट रसिक आयपीएलचा मनमुरादपणे आनंद लुटत आहेत. यंदाची आयपीएल 2024 सुरू होण्याआधीच अनेक कारणांनी चर्चेत आली. मुंबई इंडियन्स संघाच्या रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेतल्यानं चाहते संतापले आहेत. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) हाती मुंबई इंडियन्स संघाची धुरा दिली आहे. पण पांड्यानं दोन्ही सामन्यामध्ये आपल्या नेतृत्वामध्ये पराभवाचा सामना केला आहे. यामुळे चाहते संतापले आहेत.

मुंबई इंडियन्स संघ हा आयपीएलमधील तब्बल 5 वेळा जेतेपद मिळवलेला संघ आहे. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये संघाचा पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. यामुळे आता चाहते संतापले आहेत. सचिन तेंडुलकर, हरभजन सिंह, शॉन पॉलॉक, डीजे ब्रावो, रिकी पॉटींग, रोहित शर्मा, कायरन पॉलार्ड, सुर्यकुमार यादव आणि आता हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधारपद दिलं आहे.

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सचा नववा कर्णधार आहे. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद दिलं आणि मुंबई इंडियन्सला दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाला दोष दिला जात आहे. हार्दिकच्या (Hardik Pandya) नेतृत्वात खेळत असताना मुंबई इंडियन्स संघाला लज्जास्पद विक्रमाचा समाना करावा लागत आहे.

कोणता लज्जास्पद विक्रम?

मुंबई इंडियन्स संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वामध्ये खेळत आहे. मात्र पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये पराभव झाल्याने संघावर लज्जास्पद विक्रमाची नोंद झाली. 2008 मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वामध्ये मुंबई इंडियन्स संघ दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाला.

2009 ते 2023 या वर्षामध्ये मुंबई इंडियन्स संघ पहिल्या दोन सामन्यांमध्ये कधीच पराभूत झाला नाही. मात्र यंदा 2024 मध्ये तो दोनदा पराभूत झाल्यानं हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाला लज्जास्पद विक्रमाचा सामना करावा लागला आहे.

फलंदाजीतही खास प्रदर्शन नाही

हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाची कामगिरी पाहता म्हणावी अशी कामगिरी नाहीये. तर फलंदाजी पाहता म्हणावी तशी चांगली कामगिरी पाहायला मिळत नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये 30 धावा देत एकही विकेट घेतली गेली नाही. तर फलंदाजीमध्ये केवळ 11 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यातही हार्दिकने 4 षटकात 46 धावा दिल्या आणि फलंदाजीत फटकेबाजीची गरज असताना 20 चेंडूत केवळ 24 धावा केल्या.

News Title – Hardik Pandya Get Bad Record It Again16 Years

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya सारखा का धरतो स्वतःच्या गोलंदाजीचा आग्रह?, T20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती समोर

पुरुषांपेक्षा महिलांना ‘या’ गोष्टीची जास्त सवय; धक्कादायक अहवाल समोर!

CBI चा राष्ट्रवादीच्या नेत्याला मोठा दिलासा; 840 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी क्लीनचिट

मोठी बातमी: नवनीत राणांनी दिला राजीनामा… राजीनामा देताना ढसाढसा रडल्या!

अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; ‘त्या’ वक्तव्याने खळबळ