Kangana Ranaut | बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. तिला भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडी या जागेवरून मैदानात उतरवले आहे. कंगना तिच्या स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयावर भाष्य करत असते. कंगना कायम तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. बॉलिवूड असो की मग राजकारण… प्रत्येक विषयांवर भाष्य करणारी कंगना आता अधिकृतपणे राजकीय मैदानात उतरली आहे. (Kangana Ranaut BJP)
भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील कंगनाने एक वादग्रस्त विधान केले. अलीकडेच तिने अभिनेत्री उर्मिला मांतोडकरबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे विरोधकांसह नेटकऱ्यांनी तिला लक्ष्य केले. आता कंगना तिच्या मतदारसंघात प्रचार करत असून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
कंगनाची प्रचार रॅली
प्रचारादरम्यान कंगना राणौत माध्यमांशी बोलताना म्हणाली की, मंडी येथे प्रचारादरम्यान जमा झालेला जनसमुदाय पाहू शकता. मोठ्या संख्येने लोक इथे उपस्थित आहेत. मंडीची मुलगी, मंडीतील राष्ट्रवादी आवाज या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करेल याचा सर्वांना अभिमान आहे. भाजपसाठी विकास हाच मुख्य मुद्दा आहे. मंडीतील जनता त्यांच्या मनात काय आहे ते दाखवून देईल.
खरं तर कंगनाने 2020 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरवर जोरदार टीका केली होती. कंगनाने उर्मिलाला सॉफ्ट पॉर्नस्टार म्हटले होते. मात्र, आता निवडणुकीच्या तोंडावर कंगना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसते. उर्मिलावर कंगनाने स्फॉट पॉर्न स्टार असल्याची आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावेळेस फार मोठा वाद देखील निर्माण झाला होता. आता कंगनाने तिच्या पॉर्न स्टारच्या वक्तव्यावरून स्पष्टीकरण देताना अभिनेत्री सनी लिओनीचा उल्लेख केला.
#WATCH | Lok Sabha elections 2024 | Mandi, Himachal Pradesh: BJP candidate and actor Kangana Ranaut says, “You can see the large gathering here. A lot of people have come here. They are all proud that the daughter of Mandi, the nationalist voice from Mandi will represent the… pic.twitter.com/N6p0Sp8sI9
— ANI (@ANI) March 29, 2024
Kangana Ranaut लोकसभेच्या रिंगणात
दरम्यान, उर्मिला मांतोडकरने मागील लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. तिला उत्तर मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले. पण, भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी तिचा पराभव केला होता. तेव्हापासून उर्मिला राजकारणापासून लांब आहे.
लोकसभेचे तिकीट मिळाल्यानंतर कंगनाने म्हटले की, लोकसभेचे तिकीट मिळवणे हे माझ्यासाठी कठीण नव्हते. उर्मिलाला तिकीट मिळू शकते मग मला का नाही? स्फॉट पॉर्न हा आक्षेपार्ह शब्द आहे का? आपल्या देशात पॉर्न स्टारचा जितका आदर केला जातो तेवढा कोणाचाच केला जात नाही. हे सनी लिओनीला जाऊन विचारा. कंगनाच्या या विधानानंतर तिला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले.
News Title- Lok Sabha elections 2024 Mandi Kangana Ranaut’s campaign rally
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून ऋषभ पंत ठरला नंबर 1; सामना सुरु होताच कित्येक दिग्गज खेळाडूंना टाकले मागे
रिषभ हे वागणं बरं नव्हं…! राजस्थानविरूद्ध स्वस्तात बाद होताच पारा चढला, Video
या 4 राशींच्या व्यक्तींवर पडेल मोठी जबाबदारी, जाणून घ्या तुमचे आजचे भविष्य
आता घरबसल्या करा FASTag रिचार्ज तेही अगदी काही मिनिटांतच; या स्टेप्स फॉलो करा
ऐश्वर्या सोडणार ‘बच्चन’ कुटुंबियांचं घर?; अखेर कारण आलं समोर