…म्हणून ऋषभ पंत ठरला नंबर 1; सामना सुरु होताच कित्येक दिग्गज खेळाडूंना टाकले मागे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rishabh Pant plays 100 Matches Delhi Capitals l इंडियन प्रीमियर लीगचा 2024 मधील 17वा सीझन सध्या जोरदार सुरु आहे. या हंगामात प्रत्येक सामन्यात नवनवीन रेकॉर्ड बनवले जात आहेत. अशातच या मोसमातील आयपीएल 2024 चा 9 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला आहे.

ऋषभ पंतने केली खास कामगिरी :

या सामन्यासाठी मैदानात उतरताच दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने एक खास कामगिरी आपल्या नावावर केली आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅप्टिलसकडून 100 सामने खेळणारा तो आता इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. तसेच आयपीएलमध्ये एकाच संघासाठी 100 सामने पूर्ण करणारा तो सातवा खेळाडू देखील ठरला आहे.

Rishabh Pant plays 100 Matches Delhi Capitals l ऋषभ पंत ठरला DC कडून सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू :

ऋषभ पंत आता दिल्ली कॅप्टिलससाठी सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. आतापर्यंत हा विक्रम अमित मिश्राच्या नावावर होता. मिश्राने दिल्ली कॅप्टिलससाठी 10 वेगवेगळ्या हंगामात एकूण 99 सामने खेळले आहेत. तसेच श्रेयस अय्यरने त्याच्या कारकिर्दीत 7 हंगामांसाठी दिल्लीचे प्रतिनिधित्व केले आहे, ज्यामध्ये त्याने एकूण 87 सामने खेळले आहेत.

दिल्ली कॅपिटल्ससाठी चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू हा डेव्हिड वॉर्नर आहे, ज्याने या फ्रँचायझीसाठी 82 सामने खेळले आहेत. वीरेंद्र सेहवाग निवृत्त झाला असला तरी त्याच्या आयपीएल कारकिर्दीत त्याने डीसीसाठी 79 सामने खेळले आहेत.

कोणते खेळाडू कोणत्या संघासाठी खेळले 100 सामने :

सुरेश रैना सीएसकेसाठी 100 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे. रैनाने आपल्या कारकिर्दीची 12 वर्षे चेन्नई सुपर किंग्जला समर्पित केली होती. हरभजन सिंग मुंबई इंडियन्ससाठी100 सामने पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. 2008 पासून या फ्रँचायझीसाठी खेळत असलेल्या आरसीबीसाठी विराट कोहली हा पहिलाच खेळाडू होता. केकेआरला दोन वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या गौतम गंभीरने या फ्रँचायझीसाठी सर्वात जलद 100 सामने पूर्ण केले होते.

अजिंक्य रहाणे त्याच्या आयपीएल कारकिर्दीत अनेक संघांसाठी खेळला आहे, परंतु त्याने प्रथम राजस्थान रॉयल्ससाठी 100 सामने खेळले आहे. सनरायझर्स हैदराबादसाठी ही कामगिरी भुवनेश्वर कुमारने केली आहे, जो 2024 मध्ये सलग 11व्या हंगामात SRHकडून खेळत आहे. ही कामगिरी करणारा ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा पहिला खेळाडू ठरला आहे.

News Title : Rishabh Pant plays 100 Matches Delhi Capitals

महत्त्वाच्या बातम्या-

रिषभ हे वागणं बरं नव्हं…! राजस्थानविरूद्ध स्वस्तात बाद होताच पारा चढला, Video

या 4 राशींच्या व्यक्तींवर पडेल मोठी जबाबदारी, जाणून घ्या तुमचे आजचे भविष्य

आता घरबसल्या करा FASTag रिचार्ज तेही अगदी काही मिनिटांतच; या स्टेप्स फॉलो करा

ऐश्वर्या सोडणार ‘बच्चन’ कुटुंबियांचं घर?; अखेर कारण आलं समोर

हार्दिक पांड्यामुळे मुंबई इंडियन्सवर लज्जास्पद विक्रमाची नोंद