आता घरबसल्या करा FASTag रिचार्ज तेही अगदी काही मिनिटांतच; या स्टेप्स फॉलो करा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

How to recharge FASTag Paytm app? l गेल्या दिवसांपासून चर्चेत असलेल्या पेटीएम ॲपने एक नवीन फीचर्स सादर केले आहे, जे वापरकर्त्यांना त्यांचे FASTags रिचार्ज करण्यासाठी थेट परवानगी देत आहे. या नवीन फीचर्समुळे पेटीएम वापरकर्ते FASTags ॲपद्वारे सहजपणे रिचार्ज करू शकतात. तसेच या नवीन फीचर्समुळे टोल प्लाझावर लांब रांगेत थांबण्याची किंवा उशीराचा सामना करण्याची गरज भासत नाही.

टोल प्लाझावर लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांचा फास्टॅग कधीही आणि कुठेही रिचार्ज करता येणार आहे. याव्यतिरिक्त पेटीएम वापरकर्त्यांना आता ॲपवर HDFC बँकेकडून नवीन फास्टॅग खरेदी करण्याचा पर्याय देखील आहे.

पेटीएम ॲपवर फास्टॅग कसे रिचार्ज करावे? :

– सर्वात प्रथम ‘बिल पेमेंट्स’ विभागातील ‘FASTag रिचार्ज’ पर्यायावर टॅप करा.

– त्यानंतर तुमची फास्टॅग जारी करणारी बँक निवडा जी IDFC फर्स्ट बँक, ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, AU बँक, एअरटेल पेमेंट्स बँक, ॲक्सिस बँक, बंधन बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र असू शकते.

– पुढे तुमचा फास्टॅग लिंक केलेला वाहन क्रमांक एंटर करा आणि ‘प्रोसीड’ बटनावर टॅप करा.

– त्यानंतर तिथे दिलेली सर्व माहिती बारकाईने तपासा. आणि त्यानंतर रक्कम प्रविष्ट करा.

How to recharge FASTag Paytm app? l Paytm वर HDFC FASTag खरेदी करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा :

– पेटीएम ॲपवर ‘Buy HDFC FASTag’ शोधा आणि त्यावर क्लिक करा.

– यानंतर आवश्यक तपशील प्रविष्ट करा.

– पुढे पेमेंट करा आणि HDFC FASTag तुमच्या घरच्या पत्त्यावर वितरित केला जाईल.

News Title : How to recharge FASTag Paytm app?

महत्त्वाच्या बातम्या-

ऐश्वर्या सोडणार ‘बच्चन’ कुटुंबियांचं घर?; अखेर कारण आलं समोर

हार्दिक पांड्यामुळे मुंबई इंडियन्सवर लज्जास्पद विक्रमाची नोंद

हार्दिक पांड्याला संघातून काढणार?, ‘या’ तडाखेबाज खेळाडूमुळे हार्दिकचं करिअर सापडलंय संकटात

चित्रपट चालत नसल्याने राजकारणात एंट्री?; कंगनानं अखेर सांगितलं कारण

‘राम सातपुते खोट्या गरिबीचा…’; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप