सुकन्या समृद्धी योजनेसंदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Small Saving Schemes Interest Rate l तुम्हीही सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच 1 एप्रिल 2024 पासून विविध लहान बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे सरकारने काल जाहीर केले आहे.

यासंदर्भात अर्थमंत्रालयाने दिली माहिती :

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, 1 एप्रिल 2024 पासून सुरू होणाऱ्या आणि 30 जून 2024 रोजी संपणाऱ्या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी दर समान राहणार आहेत. तसेच

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत जमा केलेल्या रकमेवर 8.2 टक्के व्याजदर देखील मिळणार आहे. याशिवाय तीन वर्षांच्या एफडीवरील व्याजदर पूर्वीप्रमाणेच म्हणजेच 7.1 टक्के राहणार आहे.

Small Saving Schemes Interest Rate l गुंतवणूक 115 महिन्यांत परिपक्व होणार :

याशिवाय करोडो गुंतवणूकदारांच्या पसंतीच्या PPF आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीमचे व्याजदरही अनुक्रमे 7.1 टक्के आणि 4 टक्के असे राहणार असल्याचे सांगितले जात आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे किसान विकास पत्रावरील व्याजदरही 7.5 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. या सरकारी योजनेतील गुंतवणूक 115 महिन्यांत परिपक्व होईल.

याशिवाय, एप्रिल-जून 2024 तिमाहीसाठी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील (NSC) व्याजदर 7.7 टक्के इतकाच राहणार आहे. तसेच चालू तिमाहीप्रमाणे गुंतवणूकदारांना मासिक उत्पन्न योजनेवर 7.4 टक्के व्याजदराचा लाभ मिळणार आहे.

अल्पबचत योजनांवरील व्याज दर पुनरावलोकनाच्या आधारे सरकार दर तिमाहीत अधिसूचित करत असते. महत्वाची बाब म्हणजे या योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जात आहेत त्यामुळे पूर्णपणे सुरक्षित आहेत.

News Title : Small Saving Schemes Interest Rate

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्याच्या जागेवर वसंत मोरेंचा नवा डाव, ‘या’ पक्षाचं तिकीट फायनल?

भाजप उमेदवार कंगनाची प्रचार रॅली; म्हणाली, “मंडीतील राष्ट्रवादी आवाज…”

…म्हणून ऋषभ पंत ठरला नंबर 1; सामना सुरु होताच कित्येक दिग्गज खेळाडूंना टाकले मागे

रिषभ हे वागणं बरं नव्हं…! राजस्थानविरूद्ध स्वस्तात बाद होताच पारा चढला, Video

या 4 राशींच्या व्यक्तींवर पडेल मोठी जबाबदारी, जाणून घ्या तुमचे आजचे भविष्य