Pakistan | पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या तयारीला लागले आहे. पाकिस्तान सुपर लीगचा नववा (PSL 9) हंगाम संपताच पाकिस्तानचे खेळाडू आर्मी स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी गेले. तेथे खेळाडूंनी फिटनेस कॅम्पमध्ये सहभाग नोंदवत प्रशिक्षणाचे धडे घेतले. भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात भूकंप पाहायला मिळाला. पीसीबी अध्यक्षांसह कर्णधार आणि प्रशिक्षक बदलण्यात आला. जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक होणार आहे.
ट्वेंटी-20 विश्वचषक आणि द्विपक्षीय मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी पाकिस्तानचे खेळाडू लष्कराच्या जवानांसोबत सराव करताना दिसले. पण, आगामी विश्वचषकाच्या आधी शेजाऱ्यांना एक मोठा झटका बसल्याचे दिसते. कारण संघाचा यष्टीरक्षक खेळाडू आझम खान फिटनेस चाचणीत फेल झाला आहे.
फिटनेस चाचणी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाक आर्मीच्या सहकार्याने फिटनेस कॅम्पचे आयोजन केले होते. अबोटाबाद येथे प्रशिक्षण शिबिरात पाकिस्तानी खेळाडूंचा धावण्याचा सराव घेण्यात आला. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येक खेळाडूला 2 किलोमीटर धावायला सांगितले. पाकिस्तानी संघातील इतर सर्व खेळाडूंनी 2 किमीची शर्यत 10 मिनिटांत पूर्ण केली. पण आझम खानला यासाठी वेळ कमी पडला.
आझम खान केवळ 1.5 किमी धावू शकला. खरं तर हे अंतर गाठायला त्याला 20 मिनिटे लागले, जे नियोजित वेळेच्या दुप्पट होते. मोहम्मद रिझवान, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी यांसह अन्य खेळाडूंनी 9 मिनिटांहून कमी कालावधीत अंतर गाठले. मोहम्मद नवाजने 9 मिनिटे 57 सेंकदात 2 किमी अंतर पूर्ण केले. जर नवाजने आणखी काही सेकंदांचा कालावधी घेतला असता तर तो फिटनेस चाचणीत अपयशी ठरला असता.
فٹنس کیمپ میں دوپہر دو بجے ٹیسٹ شروع ہوجاتا ہے جس میں دو کلومیٹر دوڑ جم سیشن ہوتا ہے…
آج دو کلومیٹر رننگ میں اعظم خان کی بس ہوگئی، ڈیڑھ کلومیٹر کا فاصلہ 20 منٹ میں طے کیا اور راستے میں ہی بیٹھ گئے..
آج کی رننگ کے چیمپئن عرفان نیازی ریے جنہوں نے دو کلومیٹر کا فاصلہ 6 منٹ اور 47… pic.twitter.com/hoEhzEG2ZA— Farid Khan (@_FaridKhan) March 28, 2024
Pakistan संघाच्या खेळाडूंची टेस्ट
दरम्यान, भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकात झालेल्या दारूण पराभवानंतर शेजारील देशात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. बाबर आझमला कर्णधारपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. त्यानंतर पीसीबीने ट्वेंटी-20 संघाच्या कर्णधारपदाची धुरा शाहीन शाह आफ्रिदीच्या खांद्यावर सोपवली. तर कसोटी संघाचे नेतृत्व शान मसूदकडे देण्यात आले आहे.
विशेष बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले इमाद वसिम आणि मोहम्मद आमिर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या जर्सीत दिसणार आहेत. बोर्डाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा माघारी दिला आहे. त्यामुळे हे दोघेही ट्वेंटी-20 विश्वचषकात दिसतील यात शंका नाही.
News Title- Pakistan team players participated in fitness camp ahead of t20 world cup but azam khan failed his test
महत्त्वाच्या बातम्या –
सुकन्या समृद्धी योजनेसंदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय!
पुण्याच्या जागेवर वसंत मोरेंचा नवा डाव, ‘या’ पक्षाचं तिकीट फायनल?
भाजप उमेदवार कंगनाची प्रचार रॅली; म्हणाली, “मंडीतील राष्ट्रवादी आवाज…”
…म्हणून ऋषभ पंत ठरला नंबर 1; सामना सुरु होताच कित्येक दिग्गज खेळाडूंना टाकले मागे
रिषभ हे वागणं बरं नव्हं…! राजस्थानविरूद्ध स्वस्तात बाद होताच पारा चढला, Video