अरे व्हा! भन्नाट फीचर्ससह Xiaomi कंपनीने लाँच केली पहिली इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या किंमत

Xiaomi First Electric Car SU7 l चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने पहिली इलेक्ट्रिक कार SU7 बाजारात लाँच केली आहे. गेल्या वर्षी कंपनीने ही इलेक्ट्रिक कार 2023 मध्ये लॉन्च करण्याबाबत माहिती शेअर केली होती. आता Xiaomi ने या इलेक्ट्रिक कारची किंमत आणि फीचर्स देखील जाहीर केली आहेत. कंपनीने काल म्हणजेच 28 मार्च रोजी झालेल्या इव्हेंटमध्ये या इलेक्ट्रिक कार संदर्भात माहिती दिली आहे.

Xiaomi First Electric Car SU7 l कंपनीने SU7 कार चार प्रकारात केली लाँच :

शाओमी कंपनीने SU7 या मॉडेलसह इलेक्ट्रिक कारच्या जगात प्रवेश केला आहे. Xiaomi SU7 ही चार दरवाजांची इलेक्ट्रिक सेडान आहे. कंपनीने ही कार चार प्रकारात लाँच केली आहे. या चार प्रकारांमध्ये एंट्री-लेव्हल व्हर्जन, प्रो व्हेरिएंट, मॅक्स व्हर्जन आणि लिमिटेड फाउंडर एडिशन यांचा समावेश आहे.

शाओमी कंपनीने यासंदभात माहिती देताना सांगितले की, या सेडानचा टॉप स्पीड 265 किमी प्रतितास आहे. ही कार अवघ्या 2.78 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते. ही कार एका चार्जिंगमध्ये 810 किलोमीटर अंतर कापू शकते. या कारची पॉवरट्रेन 986 bhp पॉवर जनरेट करते.

15 मिनिटांच्या चार्जिंगसह 350 किलोमीटरचे अंतर कापण्यास सक्षम :

शाओमीच्या या कारमध्ये अल्ट्रा फास्ट चार्जिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की या कारला 486V आर्किटेक्चर देण्यात आले आहे, ज्यामुळे ही कार 15 मिनिटांच्या चार्जिंगसह 350 किलोमीटरचे अंतर कापण्यास सक्षम असणार आहे. 871V आर्किटेक्चरसह ही कार केवळ 15 मिनिटांच्या चार्जिंगसह 510 किलोमीटरचे अंतर कापू शकते.

Xiaomi च्या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत 24.90 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच सर्वात म्हणजे SU7 कारची किंमत चीनमध्ये विकल्या जाणाऱ्या Tesla Model 3 पेक्षा कमी आहे. कारच्या लाँचिंगसोबतच कंपनीने सांगितले की, ते या महिन्यापासून ग्राहकांना ही कार डिलिव्हर करणार आहेत.

Xiaomi First Electric Car SU7 l तसेच कंपनीने ही कार काही दिवसांपूर्वीच चीनमधील अनेक शोरूममध्ये ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे अनेक ग्राहक कार खरेदीसाठी आकर्षित देखील झाले आहेत. जर तुम्ही देखील कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर शाओमी कंपनीची SU7 कार सर्वात्तम आहे.

News Title : Xiaomi First Electric Car SU7 Launch

महत्त्वाच्या बातम्या-

सुकन्या समृद्धी योजनेसंदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय!

पुण्याच्या जागेवर वसंत मोरेंचा नवा डाव, ‘या’ पक्षाचं तिकीट फायनल?

भाजप उमेदवार कंगनाची प्रचार रॅली; म्हणाली, “मंडीतील राष्ट्रवादी आवाज…”

…म्हणून ऋषभ पंत ठरला नंबर 1; सामना सुरु होताच कित्येक दिग्गज खेळाडूंना टाकले मागे

रिषभ हे वागणं बरं नव्हं…! राजस्थानविरूद्ध स्वस्तात बाद होताच पारा चढला, Video