उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ प्रसिद्ध हिल स्टेशनला भेट द्या!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hill Stations Near Nashik l नाशिक हे अतिशय सुंदर शहर आहे. हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. नाशिकमध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत, याशिवाय प्रसिद्ध कुंभमेळा देखील आयोजित केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का? नाशिकमधील तीर्थक्षेत्रांव्यतिरिक्त या शहराजवळ सुंदर हिल स्टेशन्स देखील आहेत. जिथे तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेऊ शकता. तर आज आपण नाशिकजवळ असलेल्या प्रसिद्ध हिल स्टेशनबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जिथे तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीचा अगदी मनसोक्त आनंद घेऊ शकता.

माळशेज घाट :

माळशेज घाटातील थंड वारा, सुंदर तलाव आणि धबधबे पर्यटकांना भुरळ घालतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत नाशिकजवळच्या या हिल स्टेशनला नक्की भेट द्या आणि तेथील हिरवाईचा आनंद घ्या. येथे तुम्हाला गुलाबी फ्लेमिंगो, अल्पाइन स्विफ्ट, व्हिसलिंग थ्रश इत्यादी अनेक विदेशी पक्षी पाहायला मिळतील. याशिवाय इथल्या ऐतिहासिक स्थळांना देखील भेट देता येईल.

Hill Stations Near Nashik l कोरोली :

तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर कोरोली या हिल स्टेशनला नक्की भेट द्या. हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. कोरोली भव्य दऱ्या, हिरवीगार शेतं आणि असंख्य झाडांनी वेढलेले आहे. तुम्ही इथल्या आल्हाददायक हवामानाचा देखील आनंद घेऊ शकता.

सूर्यमाळ :

सूर्यमाळ हे हिल स्टेशन नाशिकपासून फक्त 86 किमी आणि मुंबईपासून 143 किमी अंतरावर आहे. सूर्यमाळ हे महाराष्ट्रातील सर्वात उंच हिल स्टेशन आहे. येथील निसर्गाच्या सुंदर दृश्यांचा आनंद लुटता येतो. याशिवाय तुम्ही येथे देवबंद मंदिर आणि अमला वन्यजीव अभयारण्य देखील पाहू शकता.

Hill Stations Near Nashik l भंडारदारा :

भंडारदारा हे हिल स्टेशन नाशिकपासून 72 किमी अंतरावर आहे. कळसूबाई पर्वत हे येथील सर्वोच्च शिखर आहे. येथे तुम्ही निसर्गाच्या नयनरम्य दृश्यांचा आनंद घेऊ शकता. जर तुम्हाला काही क्षण शांततेत घालवायचे असतील तर हे हिल स्टेशन तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते.

News Title : Hill Stations Near Nashik

महत्त्वाच्या बातम्या-

अरे व्हा! भन्नाट फीचर्ससह Xiaomi कंपनीने लाँच केली पहिली इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या किंमत

20 मिनिटांत देखील 2 किमी धावू शकला नाही; पाकिस्तानी खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये फेल

सुकन्या समृद्धी योजनेसंदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय!

पुण्याच्या जागेवर वसंत मोरेंचा नवा डाव, ‘या’ पक्षाचं तिकीट फायनल?

भाजप उमेदवार कंगनाची प्रचार रॅली; म्हणाली, “मंडीतील राष्ट्रवादी आवाज…”