कोरोना काळात ताट, वाट्या, थाळ्या का वाजवायला लावल्या?, मोदींचा सर्वात मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PM Narendra Modi | जगभरात गेल्या तीन वर्षांपूर्वी कोरोनाने अक्षरशः थैमान घातलं होतं. कोरोनामुळे राज्यात अनेक नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोरोना महामारीचा सामना केला. कोरोना काळात अनेकांचे व्यापार बुडाले, काहींच्या नोकऱ्या गेल्या. या काळात आरोग्य यंत्रणेपासून प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत सर्वांवरच प्रचंड मोठं दडपण, जबाबदारी आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळत होतं. मात्र, या वेळेस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थाळी आणि टाळ्या वाजवण्यासाठी सांगितलं होतं. परंतू अजून सुद्धा हे करण्यास का सांगितलं असेल? असे प्रश्न जनतेला पडत आहेत. दरम्यान, याबदल स्वतः मोदींनी याचं खरं कारण सांगत खुलासा केला आहे.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांच्यासोबत नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संवाद साधला. भारतात होत असलेल्या अनेक नवीन घडामोडींबाबत बिल गेट्स यांच्यासोबत मोदींनी चर्चा केली. या वेळी कोरोमा काळातील व्यवस्थापनावरही मोदींना काही प्रश्न विचारण्यात आले. बोलत असताना बिल गेट्स यांनी मोदींनी लोकांना कोरोनामध्ये थाळी, ताट वाजवणे आणि दिवे लावण्यास का सांगितलं होतं? असा प्रश्न केला. शिवाय कोरोना काळात सगळं नियोजन कशा प्रकारे केलं? असे एक न अनेक प्रश्न त्यांनी मोदींना विचारले.

या वेळी मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, कोरोना काळात मी जनतेला योग्य ती काळजी घेण्यास सांगितली होती. कोरोनासोबच कशा प्रकारे लढायचं? याबद्दल मी जनतेला कायम सांगत होतो. जनतेसोबत मी ऑनलाईन संपर्कात होतो. कोरोना विषाणूविरोधातली लढाई आपल्या सगळ्यांची आहे, यासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्यावर भर दिला. ही लढाई ‘विषाणू विरुद्ध सरकार’ अशी नसून ती ‘आपलं आयुष्य विरुद्ध विषाणू’ अशी लढाई आहे ही माझी भूमिका होती.

मी स्वतः नियम पाळत होतो-

पुढे बोलत असताना मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, कोरोमा जगभरात झपाट्याने वाढू लागला होता. मी पहिल्या दिवसापासून देशातील सगळ्यांशी चर्चा करत होतो. मी स्वत: सगळे नियम पाळून त्यातून लोकांसमोर उदाहरण ठेवलं”. या वेळी मी जनतेला आवाहन केलं होतं. ते आवाहन जनेतेनं पूर्णपणे पाळलं. मात्र, या आवाहनाची आमच्याकडे मस्करी केली जात आहे.

टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे लावा-

टाळ्या, थाळी, दिवे याबाबत मी जनतेला आवाहन केलं होतं. आज या गोष्टीवर आमच्या देशात मस्करी केली जात आहे.  पण मला लोकांना विश्वासात घ्यायचं होतं की आपल्याला ही लढाई एकत्र लढायची आहे. तेव्हा हा विश्वास निर्माण झाला की आपल्याला आपलं आयुष्य वाचवतानाच इतरांचं आयुष्य वाचेल यासाठीही प्रयत्न करायचे आहेत. मग ती एक प्रकारे व्यापक चळवळ झाली. त्यामुळे नंतर मी देशवासीयांना जे काही सांगायचो, त्याचा स्वीकार व्हायचा. मला कुणी विचारायचं नाही की मास्क लावायला पाहिजे की नाही”, असं मोदींनी सांगितलं.

News Title : PM Narendra Modi reveals truth about corona

महत्त्वाच्या बातम्या-

भाजप उमेदवार कंगनावर काँग्रेसची बोचरी टीका; आता अभिनेत्रीची आई संतापली!

RCB च्या होम ग्राऊंडवर KKR देणार टक्कर; अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11

जबरदस्त कॅमेरा फीचर्ससह Itel कंपनीचा स्मार्टफोन लाँच; मिळणार 108MP कॅमेरा

उष्णतेवर मात करण्यासाठी उन्हाळ्यात ‘हे’ पदार्थ आवर्जून खा; मिळतील फायदे

‘थोडी तरी लाज बाळग’; तिसऱ्या पत्नीसोबतच्या त्या फोटोंमुळे नेटकरी शोएब मलिकवर भडकले