जबरदस्त कॅमेरा फीचर्ससह Itel कंपनीचा स्मार्टफोन लाँच; मिळणार 108MP कॅमेरा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Itel S24 Launch l स्मार्टफोन निर्माता कंपनी itel ने एक स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. ज्या ग्राहकांना कमी बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करायचा असेल त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन सर्वात बेस्ट असणार आहे. कंपनीने बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या फोनमध्ये 108 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आणि पॉवरसाठी 5,000mAh बॅटरी यांसारखी अनेक फीचर्स दिले आहेत.

डिस्प्ले :

itel S24 स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच HD+ डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन 1612 x 720 पिक्सेल, 480 nits ब्राइटनेस आणि 90Hz चा रिफ्रेश दर आहे.

Itel S24 Launch l प्रोसेसर आणि स्टोरेज :

कंपनीचा हा स्मार्टफोन Helio G91 प्रोसेसरच्या आधारे कार्य करतो. यामध्ये Mali-G52 MC2 GPU देखील आहे. हा फोन 4GB + 128GB, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB पर्यायांसह सादर केला आहे. याला 8GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट देखील मिळत आहे.

बॅटरी :

कंपनीने या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे, जी 18W टाइप-सी क्विक चार्ज तंत्रज्ञानाला सपोर्ट करणाऱ्या चार्जरने चार्ज करता येते.

OS आणि इतर वैशिष्ट्ये :

फोनमध्ये GPT AI असिस्टंट आणि डायनॅमिक बार देखील देण्यात आल आहे. हा फोन Android 13 OS वर चालतो.

Itel S24 Launch l किंमत :

हा स्मार्टफोन सध्या itel च्या ग्लोबल साइटवर आहे. कंपनी लवकरच भारतात हा स्मार्टफोन लॉन्च करू शकते. कंपनीने या स्मार्टफोनच्या किमतीची माहिती अद्याप दिलेली नाही. तसेच हा फोन तीन कलर व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे. यामध्ये डॉन व्हाइट, कोस्टलाइन ब्लू आणि स्टाररी ब्लॅक कलर आहेत.

News Title – Itel S24 Launch

महत्त्वाच्या बातम्या

‘थोडी तरी लाज बाळग’; तिसऱ्या पत्नीसोबतच्या त्या फोटोंमुळे नेटकरी शोएब मलिकवर भडकले

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ प्रसिद्ध हिल स्टेशनला भेट द्या!

अरे व्हा! भन्नाट फीचर्ससह Xiaomi कंपनीने लाँच केली पहिली इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या किंमत

20 मिनिटांत देखील 2 किमी धावू शकला नाही; पाकिस्तानी खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये फेल

सुकन्या समृद्धी योजनेसंदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय!