RCB च्या होम ग्राऊंडवर KKR देणार टक्कर; अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

RCB vs KKR | आरसीबी आणि केकेआर या दोन्ही संघांनी त्यांचे मागील सामने जिंकले आहेत. त्यातच आरसीबीला नेहमीच होम ग्राऊंडवर खेळण्याचा फायदा होतो, त्यामुळे विजयाची मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न आज आरसीबी संघ करेल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात आज (29 मार्च)बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना होणार आहे. आरसीबीला या सामन्यात केकेआरकडून तोडीचं आव्हान दिलं जाईल. प्रतिस्पर्धी केकेआरकडेही आक्रमक फलंदाज आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहलीकडून यावेळी संघाला आणि चाहत्यांनाही पुन्हा एकदा आशा असतील. कोहलीने गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावलं होतं. त्याच्या जोरावर संघ लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरला. कोहलीने आयपीएलमध्ये सात वेळा 150 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी केली आहे.त्यामुळे कोहली आणि कर्णधार फाफ डुप्लेसिस या सलामीच्या जोडीला रोखण्याचं आव्हान केकेआरच्या गोलंदाजांसमोर असेल.

RCB vs KKR सामना रंगणार

विराटसोबतच पंजाबविरुद्ध अखेरच्या षटकांत आरसीबीचा दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर यांनी निर्णायक खेळी केली होती. आता कार्तिकवरही जोरदार फटकेबाजी करण्याची जबाबदारी असेल. बंगळूरुच्या गोलंदाजीची भिस्त पुन्हा मोहम्मद सिराजवरच असेल. इतर गोलंदाजांना आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे.

दुसरीकडे कोलकाताच्या मधल्या फळीत कर्णधार श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणा यांसारखे फलंदाज आहेत. त्यांना सनरायजर्स हैदराबादविरुद्ध चमक दाखवता आली नाही. मात्र, रमणदीप सिंग, रिंकू सिंह आणि आंद्रे रसेल यांनी फटकेबाजी करत कोलकाताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. तसंच आयपीएल इतिहासात सर्वोच्च बोली लावत खरेदी केलेला वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कलाही प्रभाव पाडता आलेला नाही.

अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11

RCB : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, दिनेश कार्तिक, आकाश दीप, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, स्वप्नील सिंग, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, विल जॅक, कॅमेरॉन ग्रीन.

KKR : पी. सॉल्ट, व्यंकटेश अय्यर, रमणदीप सिंग, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, आरोन वरुण, हर्षित राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल.

News Title : RCB vs KKR match IPL 2024

महत्त्वाच्या बातम्या-

हार्दिक पांड्यामुळे मुंबई इंडियन्सवर लज्जास्पद विक्रमाची नोंद

हार्दिक पांड्याला संघातून काढणार?, ‘या’ तडाखेबाज खेळाडूमुळे हार्दिकचं करिअर सापडलंय संकटात

चित्रपट चालत नसल्याने राजकारणात एंट्री?; कंगनानं अखेर सांगितलं कारण

‘राम सातपुते खोट्या गरिबीचा…’; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

Hardik Pandya सारखा का धरतो स्वतःच्या गोलंदाजीचा आग्रह?, T20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती समोर