भाजप उमेदवार कंगनावर काँग्रेसची बोचरी टीका; आता अभिनेत्रीची आई संतापली!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kangana Ranaut | लोकसभा निवडणुकीसाठी आता जवळपास सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक पार पडेल. 4 जून रोजी देशभरातील निवडणुकीचा निकाल समोर येईल. अनेक राजकीय पक्ष सेलिब्रिटी लोकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहेत. सत्ताधारी भाजपने हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला तिकीट दिले आहे. (Lok Sabha elections 2024)

पण, कंगनाला तिकीट जाहीर होताच काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी तिच्यावर बोचरी टीका केली होती. सुप्रिया सिनेत यांच्या टीकेला कंगनानंतर आता तिची आई आशा राणौत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुप्रिया सिनेत यांनी कंगनाचा एक बोल्ड फोटो पोस्ट करत टीका केली होती. ‘आज मंडी में क्या भाव चल रहा है?’, अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी लिहिले होते.

कंगनाची आई संतापली

पण, वाद चिघळल्यानंतर सुप्रिया यांनी स्पष्टीकरण दिले होते. सुप्रिया सिनेत यांनी यावर स्पष्टीकरण देताना हा फोटो आणि कॅप्शन मी पोस्ट केले नसल्याचे सांगितले. माझ्या सोशल मीडियाचा ॲक्सेस असलेल्या व्यक्तीने हे चुकीचे कृत्य केले असल्याचे त्या म्हणाल्या. कंगनाबद्दल केलेल्या या आक्षेपार्ह कमेंटवर कंगनाची आई आशा राणौत यांनी भाष्य केले आहे.

आशा राणौत म्हणाल्या की, त्यांच्या देखील घरात मुली आणि सून आहे. त्या जर अशा बोलल्या आहेत, तर त्यांनी विचार करावा की जर कोणी स्वतःच्या मुलांविरुद्ध असे बोलले तर त्यांना कसे वाटेल… मला देखील तेच दुःख आहे… माझी मुलगी मोठी सेलिब्रिटी आहे, तिला संपूर्ण जग ओळखते. पण असुद्या एक व्यक्ती अपमानास्पद भाषा बोलली तर मी संपूर्ण पक्षाला का दोष देऊ? प्रत्येकजण वाईट नसतो.

 

Kangana Ranaut भाजपची उमेदवार

दरम्यान, कंगना राणौत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. तिला भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडी या जागेवरून मैदानात उतरवले आहे. कंगना तिच्या स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयावर भाष्य करत असते. कंगना कायम तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. बॉलिवूड असो की मग राजकारण… प्रत्येक विषयांवर भाष्य करणारी कंगना आता अधिकृतपणे राजकीय मैदानात उतरली आहे.

आज शुक्रवारी प्रचारादरम्यान कंगना राणौत माध्यमांशी बोलताना म्हणाली की, मंडी येथे प्रचारादरम्यान जमा झालेला जनसमुदाय पाहू शकता. मोठ्या संख्येने लोक इथे उपस्थित आहेत. मंडीची मुलगी, मंडीतील राष्ट्रवादी आवाज या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करेल याचा सर्वांना अभिमान आहे. भाजपसाठी विकास हाच मुख्य मुद्दा आहे. मंडीतील जनता त्यांच्या मनात काय आहे ते दाखवून देईल.

News Title- Kangana Ranaut’s mother Asha Ranaut has responded to Congress leader Supriya Shrinate
महत्त्वाच्या बातम्या –

RCB च्या होम ग्राऊंडवर KKR देणार टक्कर; अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11

जबरदस्त कॅमेरा फीचर्ससह Itel कंपनीचा स्मार्टफोन लाँच; मिळणार 108MP कॅमेरा

उष्णतेवर मात करण्यासाठी उन्हाळ्यात ‘हे’ पदार्थ आवर्जून खा; मिळतील फायदे

‘थोडी तरी लाज बाळग’; तिसऱ्या पत्नीसोबतच्या त्या फोटोंमुळे नेटकरी शोएब मलिकवर भडकले

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ प्रसिद्ध हिल स्टेशनला भेट द्या!