कंगनानंतर ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री राजकारणात येणार?; थेट म्हणाली..

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kriti Sanon | लोकसभा निवडणुकीमुळे देशातील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कलाकारांचीही राजकारणात एंट्री होताना दिसतेय. नुकतंच अभिनेत्री कंगना रनौतला भाजपाने लोकसभेचं तिकीट दिलं आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तर, कालच अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाला आहे. त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. आता शिवसेनेच्या तिकीटावर गोविंदा मुंबईतून लोकसभा निवडणूक लढविण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशातच एका अभिनेत्रीने केलेल्या वक्तव्यामुळे लवकरच अजून एका फिल्म स्टारची राजकारणात एंट्री होणार असल्याची चर्चा आहे.

क्रिती सेनन राजकारणात येणार?

कंगना राणौत, अरुण गोविल, गोविंदा यांसारख्या कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला आहे. आता अभिनेत्री क्रिती सेनन हिने राजकारणात येण्याविषयी तिचं मत मांडलं आहे. एका समिटदरम्यान क्रितीला राजकारणाविषयी तिचं मत मांडण्यास सांगण्यात आलं होतं. यावेळी क्रिती मोकळेपणाने व्यक्त झाली.

“मी या गोष्टीचा कधीच विचार केला नाही. जोपर्यंत मला मनापासून एखादी गोष्ट आवडत नाही किंवा माझी मानसिक तयारी होत नाही तोपर्यंत मी कधीच हे करेन किंवा ते करेन असं ठरवत नाही. जर एके दिवशी माझ्या मनात आलं की मला यापेक्षा काही अधिक करायचं आहे, तर तेव्हा नक्की करेन. ज्या गोष्टी आपण आधी केल्या नाहीत, त्या करण्याचं आव्हान स्वीकारलं पाहिजे”, असं क्रिती (Kriti Sanon) म्हणाली आहे.

क्रिती सेननचं मोठं वक्तव्य

सध्या क्रिती सेनन चर्चेत आली आहे. अभिनेत्री कंगना ही मंडी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे तर अभिनेते अरुण गोविल मेरठ या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. यातच क्रितीच्या राजकीय एंट्रीबाबतही चर्चा रंगल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

क्रितीच्या (Kriti Sanon) फिल्मी करीअरबद्दल बोलायचं झाल्यास तिचा ‘क्रू’ हा चित्रपट आजच (29 मार्च) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. यामध्ये क्रितीसोबत तब्बू आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. राजेश ए. कृष्णन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

News Title : Kriti Sanon big statement about politics

महत्त्वाच्या बातम्या-

आता घरबसल्या करा FASTag रिचार्ज तेही अगदी काही मिनिटांतच; या स्टेप्स फॉलो करा

ऐश्वर्या सोडणार ‘बच्चन’ कुटुंबियांचं घर?; अखेर कारण आलं समोर

हार्दिक पांड्यामुळे मुंबई इंडियन्सवर लज्जास्पद विक्रमाची नोंद

हार्दिक पांड्याला संघातून काढणार?, ‘या’ तडाखेबाज खेळाडूमुळे हार्दिकचं करिअर सापडलंय संकटात

चित्रपट चालत नसल्याने राजकारणात एंट्री?; कंगनानं अखेर सांगितलं कारण