जास्त मीठ खाणं ठरु शकतं घातक, आजच पाहा कमी मीठ खाण्याचे फायदे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Benefits of Cutting Down Salt | मिठाचे सेवन हा आपल्या अन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे, त्याशिवाय अन्न चवीचं वाटत नाही. मीठ ही सर्व पदार्थांना चविष्ट बनवते.मात्र, त्याचे अधिकचे सेवन शरीरासाठी अत्यंत घातक असते. याबाबत बऱ्याचदा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इशारा दिला आहे.

प्रमाणापेक्षा मिठाचे सेवन नेहमी कमीच असायला हवे. निरोगी राहण्यासाठी शरीरात सर्व पोषक तत्वे असणे अत्यंत आवश्यक आहे. सोडियम या घटकांपैकी एक आहे, ज्याचा आपण आपल्या आहारात मीठाच्या रूपात समावेश करतो.पण, तुम्ही तुमच्या आहारात याचा अति प्रमाणात समावेश करत असाल तर त्यामुळे हृदयविकार, पक्षाघात आणि किडनीचे आजार होण्याचा धोका वाढतो.

कमी मीठ खाण्याचे फायदे

उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो : जास्त मीठ (Benefits of Cutting Down Salt ) खाल्ल्याने उच्च रक्तदाब होऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकार, पक्षाघात आणि किडनीचे आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत मीठ कमी केल्याने तुम्हाला रक्तदाब नियंत्रित ठेवता येईल आणि या गंभीर आजारांचा धोका कमी होईल.

हृदयाचे आरोग्य सुधारते : जास्त मीठ खाल्ल्याने हृदयावर ताण वाढू शकतो, ज्यामुळे हृदयसंबंधी समस्या वाढतात. म्हणून मीठ होईल तेवढे कमीच खायला हवे. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

स्ट्रोकचा धोका कमी होतो : उच्च रक्तदाब ही समस्या बऱ्याचदा मिठाचे अधिक सेवन केल्याने होते. यामुळे स्ट्रोक येण्याचा सर्वाधिक धोका असतो. म्हणून मीठ जास्त खाऊ नये. कमी मिठाचे अन्न चविष्ट लागत नाही, पण ते आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.

मूत्रपिंडाचे कार्य सुधारणे : जास्त मीठ खाल्ल्याने किडनीवर दबाव येऊ शकतो, ज्यामुळे किडनी खराब होऊ शकते आणि कालांतराने किडनीचे कार्य कमी होते. मीठ कमी केल्याने मूत्रपिंडाचे आरोग्य आणि कार्य सुधारण्यास मदत होते.

पचन क्षमता चांगली होते : मिठाच्या अतिसेवनाने (Benefits of Cutting Down Salt ) पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. हे जठराची सूज वाढवते.अशा परिस्थितीत मीठ कमी खाल्ल्याने हे धोके आणि लक्षणे टाळता येतात. यामुळे पचन क्षमताही सुधारते

वजन कमी करण्यास उपयुक्त : प्रोसेस्ड आणि उच्च-कॅलरी पदार्थांमध्ये अनेकदा मीठ जास्त असते, जे वजन वाढण्यास आणि लठ्ठपणास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे नेहमी ताजे आणि कमी प्रोसेस्ड फूड्स खाण्यास प्राधान्य द्यायला हवे.

News Title- Benefits of Cutting Down Salt  

महत्त्वाच्या बातम्या –

भाजप उमेदवार कंगनाची प्रचार रॅली; म्हणाली, “मंडीतील राष्ट्रवादी आवाज…”

…म्हणून ऋषभ पंत ठरला नंबर 1; सामना सुरु होताच कित्येक दिग्गज खेळाडूंना टाकले मागे

रिषभ हे वागणं बरं नव्हं…! राजस्थानविरूद्ध स्वस्तात बाद होताच पारा चढला, Video

या 4 राशींच्या व्यक्तींवर पडेल मोठी जबाबदारी, जाणून घ्या तुमचे आजचे भविष्य

आता घरबसल्या करा FASTag रिचार्ज तेही अगदी काही मिनिटांतच; या स्टेप्स फॉलो करा