मित्रानं ऐनवेळी घेतली माघार!, शरद पवार आता काय निर्णय घेणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Satara News: Shrinivas Patil | लोकसभा निवडणूक तोंडावर असताना शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. साताऱ्यातील संभाव्य उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने पवारांची अडचण वाढली आहे. शरद पवार सातारा दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्यामध्येच त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसंच विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं. आता या ठिकाणी कुणाला उमेदवारी मिळणार?, याबाबत चर्चा होत आहे.

श्रीनिवास पाटलांचा साताऱ्यातून लढण्यास नकार

येत्या दोन ते तीन दिवसात साताऱ्यातील (Satara News) उमेदवाराची घोषणा केली जाईल, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे पवार आता कुणाला तिकीट देणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. साताऱ्याशी यशवंतराव चव्हाण यांचा संबंध राहिला आहे. राष्ट्रवादीसाठी हा खूप महत्वाचा भाग आहे. त्यामुळे येथे कोणताही निर्णय काळजीपूर्वक घेतला पाहिजे, असं पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, आरोग्य ठीक नसल्याने आपण लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक नाही असं, श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांनी कळवल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी माघार घेण्यामागील खरं कारण अद्याप समोर आलं नाहीये. आता या ठिकाणी शशिकांत शिंदे किंवा बाळासाहेब पाटील यांना शरद पवार गटातून उमेदवारी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शरद पवार कुणाला तिकीट देणार?

सुनील माने, आमदार शशिकांत शिंदे, सारंग पाटील आणि सत्यजित पाटणकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. यापैकी कुणाच्या नावावर शरद पवार शिक्कामोर्तब करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. श्रीनिवास पाटील यांनी सातारा येथे उभं राहिल्यास शरद पवार गटाचा विजय निश्चित मानला जात होता.

आता श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांनी माघार घेतली आहे. दोन-तीन दिवसात या जागेवरील उमेदवार ठरवू. ज्यांची निवड केली जाईल त्यांना निवडून आणण्याचं काम आपलं असल्याचं पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सातारामध्ये आता कुणाला तिकीट मिळणार, याची सर्वांना उत्सुकता असेल.

News Title- Shrinivas Patil refusal to contest Satara News

महत्त्वाच्या बातम्या –

अरे व्हा! भन्नाट फीचर्ससह Xiaomi कंपनीने लाँच केली पहिली इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या किंमत

20 मिनिटांत देखील 2 किमी धावू शकला नाही; पाकिस्तानी खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये फेल

सुकन्या समृद्धी योजनेसंदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय!

पुण्याच्या जागेवर वसंत मोरेंचा नवा डाव, ‘या’ पक्षाचं तिकीट फायनल?

भाजप उमेदवार कंगनाची प्रचार रॅली; म्हणाली, “मंडीतील राष्ट्रवादी आवाज…”