‘बदनामी नको म्हणून..’, एक्स-गर्लफ्रेंडबाबत सलमानचा मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Salman Khan | अभिनेता सलमान खानने आतापर्यंत अनेक बॉलीवूड सुंदरींना डेट केलं आहे. मात्र, त्याचं नातं लग्नापर्यंत कधी पोहोचलंच नाही. तो अजूनही सिंगल आयुष्य जगत आहे. आता सलमानचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात तो त्याच्या खासगी आयुष्याबाबत मोकळं बोलताना दिसून आला.

सलमानने बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये सर्व एक्स गर्लफ्रेंड्सबद्दल मोठा खुलासा केला होता. त्याची ही मुलाखत आता व्हायरल होत आहे. सलमानने आपल्या खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.

सलमान खानचा मोठा खुलासा

‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये करणने सलमानला एक व्यक्तिगत प्रश्न केला. तुझ्यासमोर जर तुझी गर्लफ्रेंड आली तर तू काय करतोस?, असा सवाल करणने केला. यावर सलमान म्हणाला की, ‘मी अशा प्रसंगी कधीच त्यांच्या समोर जात नाही. मी त्यांच्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो. कारण, कोणत्या मुलीविषयी नको त्या चर्चा रंगलेल्या आणि त्यांची बदनामी झालेली मला आवडणार नाही.’, असं उत्तर यावेळी सलमानने (Salman Khan) दिलं.

पुढे करणने सलमानला अजून एक प्रश्न केला. ‘तू अजूनही तुझ्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल प्रोटेक्टिव्ह आहेस का?’ यावर बोलताना सलमान म्हणाला की, ‘तिने आंनदी आणि सुखी राहावं असं मला अधिक वाटतं. यासाठी मी प्रार्थना करतो. तिच्या आयुष्यात तिने आनंदाने जगावं असं मला वाटतं.’

काय म्हणाला सलमान?

एक्सची आठवण आल्यानंतर कधी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का, असा सवाल करताच सलमान ‘कधीच नाही’ असं म्हणाला. ब्रेकअपनंतर सोमी अली फक्त संपर्कात होती. पण काही दिवसांनंतर तीच्यासोबत असलेले सर्व संबंध संपले. अशी माहिती यावेळी सलमानने दिली.

सलमान खान आणि अभिनेत्री संगीता बिजलानी कधीकाळी नात्यात होते, असं म्हटलं जातं. सलमान संगिता बिजलानी हिच्या अजूनही संपर्कात आहे. आजही दोघे चांगले मित्र आहे. सलमान खान याच्या वाढदिवशी देखील संगिता त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरी गेली होती.आता पुन्हा एकदा सलमान (Salman Khan) चर्चेत आला आहे.

News Title : Salman Khan big revelation about his ex-girlfriends

महत्त्वाच्या बातम्या-

लखनऊ विजयाचं खातं उघडण्यास उत्सुक, आज पंजाबविरुद्ध रंगणार सामना

मोठी बातमी! नवाब मलिक यांची प्रकृती चिंताजनक

‘दादर स्टेशन उडवून टाकू’, धमकीच्या फोन कॉलने खळबळ

कमी बजेटमध्ये कार खरेदी करायची? तर या टॉप 5 कार आहेत सर्वात बेस्ट

बॉलिवूडमधील ‘या’ जोडप्याची मुलगी आहे सर्वात श्रीमंत; संपत्ती ऐकून व्हाल थक्क