मऊ आणि गुलाबी ओठांसाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chapped Lips Remedies | व्यक्तीला त्याचे निखळ हास्य सुंदर बनवत असतं. त्यामुळे आपली स्माइल चांगली येण्यासाठी आपले दात स्वच्छ आणि पांढरे शुभ्र असायला हवेत. यासोबतच आपले ओठ मऊ आणि गुलाबी असतील, तर ते हास्य अजून उठून दिसते.

मार्केटमध्ये ओठांसाठी अनेक प्रकारचे लिप बाम आणि लिपस्टिक आहेत, ज्यामुळे कृत्रिमरित्या ओठ गुलाबी दिसतात. पण, सतत अशा क्रीमचा वापर केल्यास त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे काही वेळा नैसर्गिक पद्धतीचाही अवलंब करायला हवा. यासोबतच काही खाण्या-पिण्याच्या गोष्टी योग्य पद्धतीने फॉलो केल्या की नैसर्गिकरित्या सुंदरता वाढते.

आता तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाश आणि पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ फुटू शकतात. यामुळे ओठ कोरडे होतात आणि चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. यासाठी केवळ लिप बाम काम करत नाही. त्यामुळे तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे ओठ मऊ आणि गुलाबी होतील.

गुलाबी ओठांसाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

कॉफी पावडर : मऊ ओठ हवे असतील (Chapped Lips Remedies) तर, एका भांड्यात कॉफी पावडर घ्यायची आणि त्यात थोडे खोबरेल तेल टाकून पेस्ट बनवून यानंतर ती पेस्ट ओठांवर लावा. थोड्या वेळाने धुवून टाका. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

कोरफड : उन्हाळ्यात कोरफडही अत्यंत गुणकारी असते. कोरफड हे त्वचेसाठी सगळ्यात बेस्ट काम करते. ऑलिव्ह ऑईलमध्ये कोरफड मिसळा आणि हे मिश्रण नियमितपणे ओठांवर लावा. तुम्हाला झटपट परिणाम दिसतील.

व्हिटॅमिन ई गोळ्या : त्वचेवर ग्लो हवा असेल तर व्हिटॅमिन ई गोळ्या खूप परिणामकारक ठरतात. केवळ ओठांसाठीच (Chapped Lips Remedies) नाही तर सर्वसाधारणपणे तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठीही व्हिटॅमिन ई गोळ्या फायदेशीर आहे.

घरगुती लिप बाम : घरी लिप बाम बनवण्यासाठी, 2 चमचे खोबरेल तेल, अर्धा चमचे शिया बटर,1 चमचे किसलेले मेण,10 थेंब व्हिटॅमिन ई तेल आणि 10 थेंब इसेंशल तेल घ्या. खोबरेल तेल, शिया बटर आणि मेण वितळू द्या आणि नंतर थंड होऊ द्या त्यात व्हिटॅमिन ई तेल आणि इसेंशल तेल घाला. तुमचा घरगुती लिप बाम तयार होईल. यात तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांचा रस किंवा बीट रसही घालू शकता. ज्यामुळे थोडा कलरही येईल.

News Title : Chapped Lips Remedies

महत्त्वाच्या बातम्या-

तूळ राशीसह या 3 राशीच्या लोकांना आजचा दिवस अत्यंत महत्वाचा

कोरोना काळात ताट, वाट्या, थाळ्या का वाजवायला लावल्या?, मोदींचा सर्वात मोठा खुलासा

बॅालिवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्यासोबत कंगनाने केली स्वतःची बरोबरी!

मित्रानं ऐनवेळी घेतली माघार!, शरद पवार आता काय निर्णय घेणार?

जास्त मीठ खाणं ठरु शकतं घातक, आजच पाहा कमी मीठ खाण्याचे फायदे