शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नवी यादी जाहीर, 40 नावांचा समावेश

UBT Star Campaigners List

UBT Star Campaigners List | लोकसभा निवडणुकीसाठी दोन दिवसांपूर्वीच भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. तर आज (30 मार्च) उद्धव ठाकरे गटानेही आपली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 40 प्रचारकांचा समावेश आहे. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लोकसभेसाठी 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 16 जणांची नावं असलेली यादी संजय राऊत यांनी ट्विट केली होती. आता प्रचारकांची यादी समोर अली आहे. त्यात 40 जणांचा समावेश आहे. (UBT Star Campaigners List )

या यादीत शिवसेनेचे पदाधिकारी, आमदार, खासदार, शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी यांचा समावेश आहे. स्टार प्रचारकांमध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, आमदार ॲड. अनिल परब यांचा समावेश आहे.

ठाकरे गटाची प्रचारकांची यादी

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे , संजय राऊत, आदेश बांदेकर, सुभाष देसाई, अनंत गिते, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत , भास्कर जाधव, अनिल देसाई, ॲड. अनिल परब, राजन विचारे, सुनील प्रभू, अंबादास दानवे, वरुण सरदेसाई , रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानुगडे-पाटील, लक्ष्मण वडले, प्रियांका चतुर्वेदी , सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुषमा अंधारे, संजय जाधव, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, संजना घाडी, शीतल शेठ-देवरुखकर

जान्हवी सावंत, शरद कोळी ,ओमराजे निंबाळकर , सुनील शिंदे , विलास पोतनीस , वैभव नाईक , नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने , सुभाष वानखेडे , प्रियंका जोशी यांच्या नावांचा (UBT Star Campaigners List) समावेश यादीत आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी लोकसभेसाठी 17 जणांची नावे जाहीर केली आहेत. काही ठिकाणी काँग्रेस आणि शरद पवार गटासोबत चर्चा सुरु असून ठाकरे गटाची भूमिका आणि तिकीट मिळालेल्या खासदारांना निवडून आणण्याची जबाबदारी या स्टार प्रचारकांवर असेल.

News Title :  UBT Star Campaigners List

महत्त्वाच्या बातम्या-

तूळ राशीसह या 3 राशीच्या लोकांना आजचा दिवस अत्यंत महत्वाचा

कोरोना काळात ताट, वाट्या, थाळ्या का वाजवायला लावल्या?, मोदींचा सर्वात मोठा खुलासा

बॅालिवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्यासोबत कंगनाने केली स्वतःची बरोबरी!

मित्रानं ऐनवेळी घेतली माघार!, शरद पवार आता काय निर्णय घेणार?

जास्त मीठ खाणं ठरु शकतं घातक, आजच पाहा कमी मीठ खाण्याचे फायदे

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .