आनंदाची बातमी! बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल ‘इतक्या’ पदांची भरती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

BOI Recruitment 2024 | बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 143 जागांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्जही मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी पात्रताही ठेवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार bankofindia.co.in च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरू शकता.

बँक ऑफ इंडियाच्या या भरतीसाठीचे अर्ज 27 मार्च 2024 पासून सुरू झाले आहेत. याची अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही 10 एप्रिल 2024 पर्यंत ठेवण्यात आली आहे. हा अर्ज कसा भरायचा आणि यासाठी काय पात्रता ठेवण्यात आलीये, याची माहिती या लेखात दिली आहे.

पात्रता काय?

अर्जदारांसाठी विविध प्रवाहांमधील रिक्त पदांसाठी अर्जाची पात्रता भिन्न असू शकते. त्यामुळे bankofindia.co.in या संकेतस्थळावर दिलेली संपूर्ण भरती अधिसूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावा.

अर्ज शुल्क किती असेल?

बँक ऑफ इंडियाच्या (BOI Recruitment 2024) या रिक्त जागेसाठी, सामान्य आणि इतर श्रेणीतील उमेदवारांसाठी 859 रुपये शुल्क आहे. तर एससी, एसटी आणि अपंगांसाठी 175 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. अर्ज फी मास्टर कार्ड किंवा व्हिसा कार्ड किंवा रुपे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे जमा केली जाऊ शकते.

निवड प्रक्रिया

बँक ऑफ इंडियामध्ये भरतीसाठी पात्र उमेदवारांची ऑनलाइन, लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. ही निवड प्रक्रिया अर्जांची संख्या आणि पात्र उमेदवारांच्या संख्येवर अवलंबून असणार आहे.

ऑनलाइन लेखी परीक्षेत इंग्रजी भाषा, संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक प्रवीणता, सामान्य ज्ञान आणि बँकिंगशी संबंधित प्रश्न विचारले जातील. इंग्रजी भाषा वगळता इतर सर्व विषयांचे प्रश्न हिंदी आणि इंग्रजी भाषेत असतील. इंग्रजी परीक्षा ही पात्रता स्वरूपाची असेल, अर्थातच गुणवत्ता यादीत इंग्रजीचे गुण समाविष्ट केले जाणार नाहीत.

News Title : BOI Recruitment 2024

महत्त्वाच्या बातम्या-

लखनऊ विजयाचं खातं उघडण्यास उत्सुक, आज पंजाबविरुद्ध रंगणार सामना

मोठी बातमी! नवाब मलिक यांची प्रकृती चिंताजनक

‘दादर स्टेशन उडवून टाकू’, धमकीच्या फोन कॉलने खळबळ

कमी बजेटमध्ये कार खरेदी करायची? तर या टॉप 5 कार आहेत सर्वात बेस्ट

बॉलिवूडमधील ‘या’ जोडप्याची मुलगी आहे सर्वात श्रीमंत; संपत्ती ऐकून व्हाल थक्क