फक्त एका दिवसात थेट हजार रुपयांनी वाढले सोन्याने भाव, जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Rate Today | महिन्याच्या अगदी सुरुवातीपासूनच सोने-चांदीच्या किंमती वाढताना दिसून आल्या. या दहा दिवसांत चांदी 3 हजार रुपयांनी महागली होती. मध्यंतरी दोन्ही धातूंनी ब्रेक घेतला. नंतर पुन्हा भावात तेजी आली. त्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. सराफा मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दीही कमी दिसून येत आहे.

26 मार्च रोजी सोन्याच्या किंमतीत 100 रुपयांनी घसरण झाली होती. 27 मार्च रोजी 200 रुपयांनी भाव वधारला होता. 28 मार्च रोजी सोने 350 रुपयांनी महागले होते. तर 29 मार्च रोजी सोने 1300 रुपयांनी महागल्याचं म्हटलं जातंय.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 63,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 68,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये आता वाढ होत होताना दिसून येत आहे.

चांदीच्या किमतीही वाढल्या

22 मार्च रोजी चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली. या आठडव्यात 25 मार्च रोजी चांदी 300 रुपयांनी वधारली. तर 27 मार्च रोजी चांदीमध्ये तेवढीच घसरण झाली. त्यानंतर परत 300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 77,800 रुपये आहे.

‘असा’ असेल कॅरेटचा भाव

गुडरिटर्न्सनुसार (Gold-Silver Rate Today) 24 कॅरेट सोने 67,252 रुपये, 23 कॅरेट 66,983 रुपये, 22 कॅरेट सोने 61,603 रुपये झाले.18 कॅरेट 50439 रुपये, 14 कॅरेट सोने 39,342 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.

वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क लागू केले जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

News Title- Gold-Silver Rate Today 30 March

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! नवाब मलिक यांची प्रकृती चिंताजनक

‘दादर स्टेशन उडवून टाकू’, धमकीच्या फोन कॉलने खळबळ

कमी बजेटमध्ये कार खरेदी करायची? तर या टॉप 5 कार आहेत सर्वात बेस्ट

बॉलिवूडमधील ‘या’ जोडप्याची मुलगी आहे सर्वात श्रीमंत; संपत्ती ऐकून व्हाल थक्क

पांड्याला धक्का?; रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार?