पांड्याला धक्का?; रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार?

Hardik Pandya | आयपीएल 2024 हंगाम सध्या सुरू आहे. यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये सर्वच संघ चुरशीची लढत देत आहेत. आयपीएलमध्ये पाच वेळा जेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्स संघाची चर्चा आहे. यंदाचा आयपीएल हंगाम सुरू होण्याआधीच रोहित शर्माचं कर्णधारपद काढत पांड्याला (Hardik Pandya) कर्णधारपदाची धुरा सांभाळायला दिली. मात्र मुंबई इंडियन्सचं होत्याचं नव्हतं होऊन बसलं आहे. पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स संघ पराभूत झाला आहे. यामुळे रोहित शर्माचे अनेक चाहते पांड्यावर (Hardik Pandya) संतापले असून नाखूश आहेत. (Hardik Pandya)

पांड्याला कर्णधारपदाची म्हणावी अशी धुरा सांभाळता आली नाही. तसेच फलंदाजी आणि गोलंदाजी म्हणावी अशी सांभाळता आली नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ खेळत असताना सामन्याची पहिली ओव्हर जसप्रीत बुमराहला दिली जायची. मात्र आता गोलंदाजीच्या रणनीतीमध्ये देखील पांड्यानं (Hardik Pandya) बदल केला आहे.

स्वत: हार्दिक पांड्यानं गुजरात टायटन्सविरोधात पहिली गोलंदाजी केली. अनेकदा जसप्रीत बुमराहला पहिल्यांदा गोलंदाजी दिली जाते. पण पांड्याच्या या निर्णयावर, खेळावर चाहत्यांनी त्याला ट्रोल करायला सुरूवात केली. गुजरात टायटन्सविरोधात मुंबई इंडियन्स संघाला 6 धावांनी पराभूत केलं आहे.

दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाची दैनी अवस्था

मुंबई इंडियन्स संघाची दुसऱ्या सामन्यामध्ये दैनी अवस्था पाहायला मिळाली. मुंबई इंडियन्स संघाला हैदराबादनं आयपीएलमधील सर्वात उच्च 277 धावसंख्या विजयासाठी दिली. मुंबई इंडियन्स संघाचे गोलंदाज या सामन्यामध्ये यशस्वी गोलंदाजी करण्यासाठी असफल ठरले. यामुळे मुंबई इंडियन्स संघाला पराभवाला समोरं जावं लागलं. कर्णधार पांड्यानं या सामन्यामध्ये देखील म्हणावी अशी कामगिरी केली नाही. 4 ओव्हर फेकत त्यानं 46 धावा दिल्या. फलंदाजीमध्ये केवळ 24 धावा केल्या आहेत. 277 धावसंख्या मुंबई इंडियन्स संघाला करता न आल्यानं मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा दुसऱ्यांदा सामना करावा लागला आहे.

पांड्यावर चाहत्यांचा संताप

हार्दिक पांड्यावर मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माचे चाहते संतापले आहेत. पांड्याला आपल्या नेतृत्वामध्ये पाहिल्या दोन्ही सामन्यामध्ये पराभव झाला. रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून पांड्याला कर्णधार केलं. त्यातही पांड्याची म्हणावी अशी खेळी पाहायला मिळाली नाही.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवलं. त्यातूनही हार्दिक पांड्याला कर्णधारपद देऊनही पांड्या म्हणावी अशी कामगिरी दाखवू शकला नाही.

News Title – Hardik Pandya Replacement And rohit Sharma Will Get Captaincy Of Mumbai Indians Team

महत्त्वाच्या बातम्या

तूळ राशीसह या 3 राशीच्या लोकांना आजचा दिवस अत्यंत महत्वाचा

कोरोना काळात ताट, वाट्या, थाळ्या का वाजवायला लावल्या?, मोदींचा सर्वात मोठा खुलासा

बॅालिवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्यासोबत कंगनाने केली स्वतःची बरोबरी!

मित्रानं ऐनवेळी घेतली माघार!, शरद पवार आता काय निर्णय घेणार?

जास्त मीठ खाणं ठरु शकतं घातक, आजच पाहा कमी मीठ खाण्याचे फायदे