मुंबईकरांनो… सी लिंकवर प्रवास करणे महागले, टोल शुल्कात तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai Bandra-Worli Sea Link Toll Tax l जर तुम्ही मुंबई शहरामधील महत्त्वाचा ठरलेला रस्ता वांद्रे-वरळी सागरी मार्गावरुन प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईतील राजीव गांधी वांद्रे-वरळी ‘सी लिंक’ पुलावरील टोल शुल्कात तब्बल 18 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हे नवे दर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

Mumbai Bandra-Worli Sea Link Toll Tax l 1 एप्रिलपासून नवीन दर लागू होणार :

एमएसआरडीसीच्या प्रवक्त्याने माहिती देताना सांगितले की, कार आणि जीपच्या एकेरी प्रवासासाठी 100 रुपये आकारले जातील, तर मिनीबस, टेम्पो आणि तत्सम वाहनांसाठी 160 रुपये आकारले जाणार आहेत. तसेच अरबी समुद्रावरील या केबल पुलावरून जाणाऱ्या ट्रकसाठी तब्बल 210 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

आतापर्यंत या 8 पदरी पुलावरून जाण्यासाठी एकेरी शुल्क कार आणि जीपसाठी 85 रुपये, मिनीबससाठी 130 रुपये आणि ट्रक व बससाठी 175 रुपये होते. हे जुने दर 1 एप्रिल 2021 पासून लागू झाले होते. मात्र आता या दरामध्ये बदल करण्यात आले आहेत.

हे दर 31 मार्च 2027 पर्यंत लागू राहणार :

सी लिंकवरील टोल शुल्काचे नवीन दर हे 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार असल्याचे सांगितले आहे. तर हे दर 31 मार्च 2027 पर्यंत लागू राहणार आहेत. सी लिंक हा आठ पदरी पूल 2009 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यानेसांगितले की, पुलावरून वारंवार जाणाऱ्या प्रवाशांसाठी परतीच्या प्रवासाचा पास आणि दैनंदिन पासचे दर त्यांच्या संबंधित वन-वे टोल शुल्काच्या 1.5 पट आणि 2.5 पट असणार आहेत. याशिवाय मासिक पासची किंमत त्यांच्या संबंधित एकेरी प्रवास दराच्या 50 पट असणार आहे.

Mumbai Bandra-Worli Sea Link Toll Tax l अधिका-यांनी सांगितले की, सी लिंकला दक्षिण टोकावरील मरीन ड्राइव्ह-वरळी कोस्टल रोड आणि उत्तरेकडील बांद्रा-वर्सोवा कोस्टल रोडशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अलीकडेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दक्षिण मुंबईतील वरळी ते मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या 10.5 किमी लांबीच्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन देखील केले. त्यामुळे लवकरच हा पूल तयार करण्यात येणार आहे.

News Title : Mumbai Bandra-Worli Sea Link Toll Tax

महत्त्वाच्या बातम्या-

HDFC बँकेने ग्राहकांना दिला मोठा झटका!

चाणक्याचे ‘हे’ 5 मंत्र फॉलो करा; व्यवसायात येईल भरभराटी!

अखेर विराट- गौतमचे झाले पॅच अप! मिठी मारून दिल्लीकरांची मने जिंकली

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

तूळ राशीसह या 3 राशीच्या लोकांना आजचा दिवस अत्यंत महत्वाचा