आधी बिनशर्त पाठिंबा, आता मनसेनं वाढवल्या एकनाथ शिंदेंच्या अडचणी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mns | उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीला संजय निरुपम यांनी विरोध केला. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली. यानंतर काँग्रेस हायकमांडने संजय निरुपम यांना पक्षशिस्तीचं पालन केलं नाही म्हणून निलंबित केलं. आता संजय निरुपम यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश होईल आणि त्यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे.

Mns ने वाढवल्या एकनाथ शिंदेंच्या अडचणी

मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबई या जागेवर शिवसेनेकडून अद्याप कोणताच उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. तर रवींद्र वायकर आणि संजय निरूपम यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र मनसे (Mns) नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत संजय निरुपम आणि रविंद्र वायकर यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे.

शालिनी ठाकरेंची पोस्ट चर्चेत

शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत भूमिका मांडली आहे. मनसेला धनुष्यबाण चिन्हावर लढायला सांगणार्‍यावर दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे, असं त्या म्हणाल्यात.

लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे. इकडून तिकडून पाला पाचोळ्या सारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये, असं म्हणत शालिनी ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे.

आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा या नावाला विरोध आहे. मनसेने मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली होती. पण एकनाथ शिंदे यांचा राज ठाकरेंच्या प्रस्तावाला विरोध होता आणि त्यांच्याकडेच उमेदवार नाही, अशी टीका शालिनी ठाकरे यांनी केली.

संजय निरुपम यांनी मराठी माणसासाठी कधीही काहीही केलेलं नाही. आमचा वाद उत्तर भारतीय लोकांसोबत नाही. आमचा मुद्दा वेगळा आहे. पण संजय निरुपम सारखे नेते आहेत, जे स्वत:ला नेते म्हणत आहेत, ते अशाप्रकारचे वाद महाराष्ट्रात निर्माण करत आहेत. अशा भूमिकेचा आम्ही विरोध करतो, असं शालिनी ठाकरे म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या- 

“चहलने माझा नवरा चोरला”, रोहित शर्माच्या पत्नीच्या आरोपांची एकच चर्चा

“देवेंद्र फडणवीसांना अटक होण्याची भीती म्हणून…”, संजय राऊतांचा धक्कादायक दावा

‘ते माझ्या बॅाडी पार्ट्सवर…’; अभिनेत्री नोरा फतेहीच्या वक्तव्याने बॅालिवूडमध्ये खळबळ

लोकांची लायकी नाही!, मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे ‘या’ कारणामुळे लोकांवर चिडली

अमित शहांच्या सभेआधी मोठा राडा, बच्चू कडू थेट पोलिसांना भिडले