“रोहित शर्मा तरी कुठे…”, ‘या’ माजी खेळाडूकडून पांड्याची पाठराखण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | देशात आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू आहे. जिकडे तिकडे आयपीएलचे वारे वाहत आहेत. यंदा राजस्थान रॉयल्स हा संघ तगडा संघ मानला जात असून आठ सामन्यांपैकी सात सामन्यात विजयी मिळवणारा संघ आहे. तर य़ाउलट आयपीएलमध्ये (IPL 2024) पाच वेळा चॅम्पियन राहिलेला मुंबई इंडियन्स संघ यंदाच्या आय़पीएल (IPL 2024) हंगामात पॉईंट्स टेबलमध्ये तळात पाहायला मिळेल. याच मुंबई इंडियन्सची फार दैणी अवस्था झाली आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) अनेक बदल झाले आहेत. मुंबई इंडियन्सचं कर्णधार पद हार्दिक पांड्याला दिल्याने रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज होते. मुंबई इंडियन्सच्या पराभवाने सर्व खापर हे पांड्याच्या माथ्यावर फुटत होतं. पांड्याच्या नेतृत्वात म्हणावी अशी कामगिरी संघ करत नसल्याने पांड्याला दोष देत आहेत. मात्र आता टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि फलंदाज वीरेंद्र सेहवागने पांड्याची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं आहे.

पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ खेळत आहे. आतापर्यंत पाचवा पराभव पत्करावा लागला आहे. सुरूवातीला घरच्या वानखेडेवर मुंबई इंडियन्सला पाणी पाजलं. मात्र आता पांड्याची पाठराखण करण्यासाठी वीरेंद्र सेहवाग पुढे सरसावला आहे.

काय म्हणाला वीरेंद्र सेहवाग?

“हार्दिक पांड्यावर स्वत:चं दडपण असू शकतं. मागील वर्षीही अशीच परिस्थिती होती. याआधी रोहित शर्मा कर्णधार होता. मात्र त्याने फारशा धावा केल्या नाहीत. मागील दोन-तीन वर्षात रोहित शर्मालाही जेतेपद मिळालं नाही. मुंबई इंडियन्सलाही माहिती होतं की याआधी अशीच परिस्थिती होती. जर त्याच्याकडून अपेक्षा आहे. तर त्याच्याकडून धावा होत नसतील, संघाचा पराभव होत असेल, विकेट निघत नसतील तर ते चुकीचं आहे”, असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला.

गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला ट्रेंड विंडोंच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सने घेतलं होतं. त्यानंतर त्याला कर्णधार पदाची धुरा सांभाळायला दिली. मात्र पांड्याच्या नेतृत्वामध्ये संघ म्हणावी अशी कामगिरी करत नसल्याने नेटकरी, चाहते, मैदानावर पांड्याला ट्रोल करताना दिसत आहेत.

प्लेऑफसाठी संघर्ष

दरम्यान, मुंबई इंडियन्सचे आणखी आयपीएलच्या सुरू असलेल्य पर्वातील आणखी 6 सामने बाकी आहेत. त्यापैकी 5 सामन्यात मुंबईला चांगल्या रनरेटने कामगिरी करावी लागणार आहे. प्लेऑफसाठी संघर्ष मुंबईला चांगला संघर्ष करावा लागणार आहे.

News Title – IPL 2024 In Virendra Sehwagh Back Again Mumbai Indians Captain Hardik pandya

महत्त्वाच्या बातम्या

“चहलने माझा नवरा चोरला”, रोहित शर्माच्या पत्नीच्या आरोपांची एकच चर्चा

“देवेंद्र फडणवीसांना अटक होण्याची भीती म्हणून…”, संजय राऊतांचा धक्कादायक दावा

‘ते माझ्या बॅाडी पार्ट्सवर…’; अभिनेत्री नोरा फतेहीच्या वक्तव्याने बॅालिवूडमध्ये खळबळ

लोकांची लायकी नाही!, मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे ‘या’ कारणामुळे लोकांवर चिडली

अमित शहांच्या सभेआधी मोठा राडा, बच्चू कडू थेट पोलिसांना भिडले