बाप लेक एकाच चित्रपटात, लेकीचं करिअर घडवण्यासाठी शाहरूखने उचललं मोठं पाऊल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shahrukh Khan And Suhana Khan | बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरूख खान हा नेहमीच अनेक कारणाने चर्चेत असतो. गेल्या वर्षी शाहरूख खान सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता ठरला. दरम्यान आता आपली मुलगी सुहाना खानसोबत तो चित्रपटामध्ये दिसणार आहे. नुकताच अभिनेत्री सुहाना खानचा आर्चीज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्या सिनेमातील सुहानाच्या अभिनयाबाबत अनेकांनी ट्रोल केलं होतं. मात्र आता शाहरूख खान आपल्या मुलीचं करिअर वाचवण्यासाठी आपल्याच मुलीसोबत काम करत आहे. (Shahrukh Khan And Suhana Khan)

बाप-लेक एकाच चित्रपटात

शाहरूख आणि लेक सुहाना (Shahrukh Khan And Suhana Khan) पहिल्यांदा रूपेरी पडद्यावर दिसणार असून शाहरूख डॉनच्या भूमिकेत दिसणार आहेत. एका मोठ्या कालावधीनंतर शाहरूख खलनायकाची भूमिका साकारणार आहे. सुहानासोबत शाहरूख ग्रेडशेडच्या भूमिकेत दिसणार आहेत. शाहरूख आणि सुहाना दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि सुजॉय घोष यांच्यासोबत काम करणार आहेत. (Shahrukh Khan And Suhana Khan)

 

View this post on Instagram

 

A post shared by D’YAVOL X (@dyavol.x)

शाहरूख आणि सुहाना करणार ‘या’ भूमिका

आपल्या मुलीच्या कारकिर्दीसाठी शाहरूखने कोणतीही कस सोडलेली नसल्याची चर्चा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटामध्ये तो गुरूची भूमिका करत आहे. तर त्याची मुलगी सुहाना ही शिष्याची भूमिका करताना दिसणार आहे. खऱ्या आयुष्यातील बाप लेकीची जोडी ही चित्रपटामध्ये दिसणार आहेत.

दोघांमध्ये काही इंटेन्स ॲक्शन सीन्सही दाखवण्यात येणार असल्याची माहिती आहे. शाहरूखने या चित्रपटासाठी लूक पूर्णपणे बदलला आहे. शाहरूख या चित्रपटात लाँग हेअरस्टाईल आणि छोट्या दाडीसह दिसणार आहे. ग्रे शेड्स व्यक्तिरेखा साकारली जात असल्याचं बोललं जात आहे. (Shahrukh Khan And Suhana Khan)

News Title – Shahrukh Khan And Suhana Khan Play In One Frame

महत्त्वाच्या बातम्या

‘ते माझ्या बॅाडी पार्ट्सवर…’; अभिनेत्री नोरा फतेहीच्या वक्तव्याने बॅालिवूडमध्ये खळबळ

लोकांची लायकी नाही!, मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे ‘या’ कारणामुळे लोकांवर चिडली

अमित शहांच्या सभेआधी मोठा राडा, बच्चू कडू थेट पोलिसांना भिडले

“पार्थला भाऊ म्हणून सांगतो…”, रोहित पवारांचा उपरोधिक टोला

“मंगळसूत्र कशासाठी?…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत