“मंगळसूत्र कशासाठी?…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aai Kuthe Kay Karte Fame | मंगळसूत्र घालणं किंवा न घालणं हा महिलेचा वैयक्तिक विषय आहे. याआधी अभिनेत्री क्षिती जोगने एका मुलाखतीमध्ये मंगळसूत्र न घालण्याबाबत आपलं परखड मत व्यक्त केलं होतं. त्यावेळी नेटकऱ्यांनी तिला अधिक प्रमाणात ट्रोल केलं होतं. मात्र आता क्षिती जोगनंतर मराठी मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीने मंगळसूत्र न घालण्याबाबत पोस्ट केली आहे. सध्या ती पोस्ट चर्चेत आहे. (Aai Kuthe Kay Karte Fame)

अभिनेत्री राधिका देशपांडे यांनी त्यांच्या स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली. ती पोस्ट मंगळसूत्राबाबत होती. काही दिवसांआधी क्षिती जोगने मंगळसूत्राविषयी वक्तव्य केलं होतं, तो व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. यावेळी अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा आणखी एका अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल झाली. (Aai Kuthe Kay Karte Fame)

“धमकी वजा सूचना समजा…”

मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही. मी मंगळसूत्र घालीन किंवा नाही घालणार. माझं लग्नं नुकतंच झालं असो किंवा नसो, माझा नवरा माझा आहे आणि मी त्याची बायको आहे ह्याची आठवण तुम्हाला करून देण्यासाठी मी मंगळसूत्र घालत नसते. त्यामुळे आत्ताच सांगते मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही. फरक पडतो. मुळात मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी, केंव्हा, कधी, कशाला ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला का देऊ? धमकी वजा सूचना समजा.(Aai Kuthe Kay Karte Fame)

“मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही!”

उत्तर द्यायची वेळ नाही पण आज मला प्रश्न नक्कीच पडला आहे. कोण होतात हे स्त्री धनाचा हिशोब, झडती, माहिती घेणारे? हे सगळं घेऊन माझं सोनं वाटून द्यायला तो सत्यनारायणाचा प्रसाद आहे? माझं सोनं हे माझं आहे, ते सौभाग्याचं लेणं आहे. आम्ही स्त्रिया सहज बोलता बोलता त्याला ‘प्रीटी ज्वेलरी‘ असं बोलून जातो. पण बहुतांश भारतीय स्त्रियांकरता सोनं, जे आई-वडिलांनी, सासु-सासऱ्यांनी दिलं आहे, जे तिच्या किंवा नवऱ्याच्या परिश्रमातून विकत घेतलं आहे, अशा सोन्याचं वजन किती बरं असेल? काही गोष्टी आकड्यात मोजता येत नसतात. अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्यांना ते नाही कळायचं. आम्ही स्त्रिया मंगळसूत्राला जीवापाड जपतो. काळजी पोटी ते ठराविक ठिकाणी घालत नाही. माझ्या घरात तर मंगळसूत्र ठेवायची एक स्वतंत्र जागा आहे. घर घ्यायची वेळ आली तेंव्हा मी माझं सोन विकलं पण मंगळसूत्र मुठीतून सुटलं नाही. आणि ह्या धनाचा हिशोब आणि वाटप आम्ही होऊ द्यायचा, ह्या डाव्या नेत्यांच्या आणि त्यांच्या पार्टीच्या धोरणांच्या पूर्णत्वा करता! मागे टिकली/बिंदी वरून चर्चा उधळली, इतक्यात मंगळसूत्र चर्चेचा विषय ठरलं तर उद्या लग्न संस्कृती वर काहीतरी घणाघाती बोलतील. तर “मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही!” विषय संपला. (Aai Kuthe Kay Karte Fame)

हा फोटो 2005 सालचा आहे, माझ्या लग्नातला. विधी सुरू होण्या आगोदरचा असल्यामुळे ह्यात मंगळसूत्र नाही पण तेंव्हा पासून हा दागिना सौभाग्याचं लेणं ठरला. फोटो जुना आहे पण जुनं ते सोनंच नाही का? म्हणूनच टिकवून ठेवायचं.

 

News Tite – Aai Kuthe Kay Karte Fame Actress Radhika Deshpande Viral Post About Mangalsutra

महत्त्वाच्या बातम्या

‘शरद पवारांच्या मनात भाजप, त्यांचा आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा..’, रवी राणांच्या दाव्याने खळबळ

फडणवीस-सामंत यांच्या भेटीनंतरही विनोद पाटील ठाम, मुख्यमंत्री उचलणार मोठं पाऊल!

पोस्टाची अल्पबचत योजना तुफान लोकप्रिय, फक्त व्याजातूनच व्हाल मालामाल!

ऐन उन्हाळ्यात नागरिकांना वीज दरवाढीचा शॉक, प्रति युनिट तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

ट्रोलिंगमुळे हार्दिक पांड्याचे मानसिक संतुलन बिघडले!, नव्या गौप्यस्फोटाने खळबळ