ऐन उन्हाळ्यात नागरिकांना वीज दरवाढीचा शॉक, प्रति युनिट तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Electricity Price Hike l गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात बसत आहेत. राज्यातील कित्येक ठिकाणी तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही झाल्याचे दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रास देखील झाले आहेत. त्यामुळे घरातील पंखा, एसी, फ्रीज यांसारख्या इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे वीज देखील वाढत आहे.

अदानी वीज समूहाने घेतला मोठा निर्णय :

अशातच उन्हाळ्यात वाढत्या विजेचा अतिवापर पाहता अदानी वीज समूहाने एक मोठा निर्णय घेतला आहे. अदानी वीज कंपनीची वीज महागली असून त्याचा फटका तब्बल 30 लाख वीज ग्राहकांना बसणार आहे. अदानी कंपनीने गेल्यावर्षी झालेल्या इंधन खर्चातील 318 कोटी 38 लाख रुपयांची वाढ वसूल करण्यासाठी राज्य ऊर्जा नियामक आयोगाकडे आदरपूर्वक प्रस्ताव सादर केला आहे.

याबाबत राज्य ऊर्जा नियामक आयोगाने सोमवारी मान्यता देखील दिली आहे. ही रक्कम इंधन अधिभारातून मे ते 24 या काळात ग्राहकांकडून वसूल केली जाणार आहे. वाणिज्य, औद्योगिक आणि इतर ग्राहकांसाठी, इंधन अधिभार वापरानुसार निर्धारित केला जाणार आहे.

Electricity Price Hike l नागरिकांना किती भुर्दंड भरावा लागणार? :

वाढत्या विजेचा वापर लक्षात घेता मे महिन्याच्या बिलापासून निवासी ग्राहकांच्या इंधन अधिभारात प्रति युनिट 70 पैसे ते 1.70 रुपये इतकी वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या मे महिन्यापासून दरमहा 0-100 युनिट वीज वापर असणाऱ्या निवासी नागरिकांकडून प्रति युनिट 70 पैसे, 101-300 युनिटसाठी 1.10 रुपये , 301-500 युनिटसाठी 1.5 रुपये आणि 500 हून अधिक वीजवापरासाठी 1.70 रुपये इंधन अधिभार आकारण्यात येणार आहेत.

सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात वीजदरवाढ करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र हे सर्वात महागडी वीज मिळणारं राज्य देखील ठरलं आहे. यानंतर आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, गोवा, तेलंगणा, गुजरात आणि मध्यप्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजेचा दर जास्त असल्याने संताप देखील व्यक्त केला जात आहे.

News Title : Adani Electricity Price Hike

महत्त्वाच्या बातम्या-

मराठमोळ्या ऋतुराजची पलटण केएल राहुलला धक्का देणार? CSK Vs LSG संघ आज भिडणार

सूरतमध्ये नवा ट्विस्ट, गुलाल उधळला, मात्र काँग्रेसच्या मागणीनं भाजपच्या आनंदावर पाणी?

धक्कादायक!!!, बारामतीत आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह, निवडणूक आयोग काय निर्णय घेणार?

अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीने पोलिसांवर केले मोठे आरोप; नेमकं प्रकरण काय?

सूर्यदेवाच्या कृपेने या दोन राशींना मिळणार चांगला पैसा