मराठमोळ्या ऋतुराजची पलटण केएल राहुलला धक्का देणार? CSK Vs LSG संघ आज भिडणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

CSK Vs LSG l आयपीएल 2024 च्या 39 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हे संघ आमने सामने येणार आहेत. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 4 सामने जिंकले आहेत, तर संघाला तीन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. तसेच दुसरीकडे केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघाने चालू हंगामात चार सामने जिंकले आहेत. लखनऊने चेन्नईचा घरच्या मैदानावर 8 विकेटने पराभव केला आहे. आता या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने CSK संघ मैदानात उतरणार आहे. मात्र प्रेक्षकांना CSK विरुद्ध लखनऊ लाइव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येईल हे जाणून घेऊयात…

CSK Vs LSG l IPL 2024 मध्ये CSK विरुद्ध LSG सामना कधी होणार? :

चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील 39 वा सामना आज म्हणजेच 23 एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे.

IPL 2024 चा 39 वा सामना कुठे खेळला जाईल? :

चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

CSK विरुद्ध LSG सामना किती वाजता सुरू होईल? :

चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यापूर्वी अर्धा तास आधी टॉस होईल.

प्रेक्षकांना CSK विरुद्ध LSG सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठं पाहता येईल? :

प्रेक्षक चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील थेट सामन्याचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स चॅनलवर पाहू शकता.

तुम्ही सीएसके विरुद्ध एलएसजी सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता? :

जिओ सिनेमा ॲपवर तुम्ही चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

CSK विरुद्ध LSG यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्ड :

चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएलमध्ये एकूण 4 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये सीएसकेने 1 सामना जिंकला, तर लखनऊने दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच एक सामना अनिर्णित राहिला आहे.

CSK Vs LSG l चेन्नईचे संभाव्य शिलेदार :

ऋतुराज गायकवाड (C), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पाथीराना, मुस्तफिजुर रहमान

लखनऊचे संभाव्य शिलेदार :

क्विंटन डी कॉक, केएल राहुल (C), दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसिन खान, यश ठाकूर

News Title : CSK Vs LSG Team Prediction

महत्त्वाच्या बातम्या-

सूरतमध्ये नवा ट्विस्ट, गुलाल उधळला, मात्र काँग्रेसच्या मागणीनं भाजपच्या आनंदावर पाणी?

धक्कादायक!!!, बारामतीत आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह, निवडणूक आयोग काय निर्णय घेणार?

अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीने पोलिसांवर केले मोठे आरोप; नेमकं प्रकरण काय?

सूर्यदेवाच्या कृपेने या दोन राशींना मिळणार चांगला पैसा

थंड घ्या… चिन्मय मांडलेकर ट्रेलिंग प्रकरणावर किरण मानेंचं बेधडक भाष्य