धक्कादायक!!!, बारामतीत आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह, निवडणूक आयोग काय निर्णय घेणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Loksabha l सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरु आहे. अशातच काल लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता. मात्र आता कुणाचा सामना कुणाविरुद्ध होणार याचं चित्र देखील स्पष्ट झालं आहे. मात्र निवडणूक आयोगाने चिन्ह वाटताना यामधील एका निवडणूक चिन्हावर खासदार सुप्रिया सुळेंनी आक्षेप घेतला आहे.

तुतारी चिन्हावरून पुन्हा वाद :

बारामती लोकसभेच्या जागेसाठी सोहेल शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र या उमेदवाराला ट्रम्पेट म्हणजेच तुतारी हे चिन्ह मिळालं आहे. या चिन्हाच्या नावाला सुप्रिया सुळेंकडून हरकत घेतल्याची समोर आली आहे. यासंदर्भातील पत्र देखील सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाला मेलवर पाठवलं आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस आहे, असे असूनही निवडणूक आयोगाने सोहेल शेख या अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिलं गेलं आहे, यामुळे मतदारांचा मोठा गोंधळ होऊ शकतो असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. यावेळी सुप्रिया सुळेंनी हा गोंधळ टाळण्यासाठी मराठी नावातील तुतारी हा शब्द बदलून त्याऐवजी दुसरा शब्द निवडणूक आयोगाकडून देण्यात यावा अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

Baramati Loksabha l सोहेल मूळ बीडचा मात्र निवडणूक लढणार बारामतीतून :

सोहेल शेख हा मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. मात्र सोहेलने बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे आणि निवडणूक आयोगाने त्याला देखील तुतारी चिन्ह दिल आहे. यामुळे मतदारांचा मोठा गोंधळ उडू शकतो.

दरम्यान बारामती लोकसभेत कोणाचा सामना कोणाविरुद्ध होणार हे स्पष्ट झालं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात तब्बल 38 उमेदवार रिंगणात आहेत, यातली प्रमुख लढत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात होणार असल्याचं स्पष्ट झालंआहे. सुप्रिया सुळे यांचं चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस आहे तर सुनेत्रा पवार यांचं राष्ट्रवादीचे जुनंच घड्याळ चिन्ह आहे.

News Title : Trumpet symbol to another candidate in Baramati

महत्त्वाच्या बातम्या-

अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीने पोलिसांवर केले मोठे आरोप; नेमकं प्रकरण काय?

सूर्यदेवाच्या कृपेने या दोन राशींना मिळणार चांगला पैसा

थंड घ्या… चिन्मय मांडलेकर ट्रेलिंग प्रकरणावर किरण मानेंचं बेधडक भाष्य

हे बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान नष्ट करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल!, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ

भर मैदानात रोहित शर्माला किस करण्याचा प्रयत्न, तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ