थंड घ्या… चिन्मय मांडलेकर ट्रेलिंग प्रकरणावर किरण मानेंचं बेधडक भाष्य

kiran mane

Kiran Mane | मराठी सिनेसृष्टीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वातावरण तापल्याचं दिसत आहे. सुप्रसिद्ध मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. चिन्मय याच्या मुलाचं नाव जहांगीर असल्याच्या मुद्यावरुन चिन्मयला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं. त्यानंतर चिन्मयने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला. यावेळी त्यांनी संताप देखील व्यक्त केला. दरम्यान चिन्मयने व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्याची पत्नी नेहाने देखील पोस्ट केली. या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया देत मराठी अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट केली आहे. ज्याची सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.

चिन्मयने घेतला निर्णय-

घडलेल्या प्रकरानंतर चिन्मयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. चिन्मयने महाराजांची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला होता. या वेळी किरण माने यांनी देखील चिन्मयने घेतलेल्या निर्णयावर भाष्य केलंय.

ते फार भयानक होतं –

किरण माने (Kiran Mane) यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, दोन दिवसांपूर्वी मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर यांच्यावर खूप किरकोळ ट्रोलींग झाली आहे. पण मात्र हा घडलेला प्रकार चुकीचा होता. पण आजकाल जनरली जे होतं त्या तुलनेत खूपच सौम्य होतं.

पण त्यानंतर त्याच्या पत्नीने प्रतिक्रिया देताना, “मी ब्राह्मण आहे आणि तो कासार आहे. आम्ही हिंदू आहोत.” हे सांगणं फार भयानक होतं. सिंपथीसाठी असेल किंवा रागाच्या भरात असेल, पण हा वाद भलत्याच दिशेला नेणारं आणि असंबद्ध होतं. ट्रोल्सच्या हेतुंना बळकटी देणारं होतं.’

किरण मानेंची पोस्ट-

‘धर्मांध अंधभक्तांचे ट्रोलींग हे फोफावणार्‍या आगीसारखे झाले आहे. हळूहळू सगळेच होरपळणार आहेत यात कुणाचीच सुटका नाही असं किरन माने म्हणाले. पुढे ते म्हणाले की, त्यातून सुटका हवी असेल तर या ट्रोल्सना राक्षसी बळ देणार्‍या शक्तीला दणका देणं. चिन्मयच्या प्रकरणातला एक मुद्दा महत्त्वाचा आहे, ‘त्याने मुलाचे नाव 2013 साली ठेवलं. त्यावेळी तो अजिबात ट्रोल झाला नव्हता. पण आज या मुद्यावर शिवीगाळ होत आहे. याला म्हणतात ‘संविधान धोक्यात येणं’. या झुंडीनं तुम्हाला तुमच्या मुलाचं नांव ठेवायचं ‘स्वातंत्र्य’ ठेवलेलं नाही.

News Title : kiran mane post goes viral

महत्त्वाच्या बातम्या-

भर मैदानात रोहित शर्माला किस करण्याचा प्रयत्न, तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर टीका, म्हणाले…

अजित पवार यांची ही शेवटची निवडणूक, त्यांचा पक्ष सुद्धा अस्तित्वात राहणार नाही!

ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाचा झटका!

चिन्मय मांडलेकरच्या निर्णयाने दिग्पाल लांजेकरांचं नुकसान?, नव्या चित्रपटाबद्दल थेट बोलले…

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .