अजित पवार यांची ही शेवटची निवडणूक, त्यांचा पक्ष सुद्धा अस्तित्वात राहणार नाही!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | राज्याचं लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर जानकरांनी शरद पवारांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं. तसेच माढात मोहिते पाटलांसोबत असलेलं 30 वर्षांचं वैर संपवून जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

“अजित पवार यांची ही शेवटची निवडणूक”

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तम जानकर आणि मोहिते पाटील घराण्याने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. अशात उत्तम जानकर यांनी इंदापूरमध्ये बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर सडकून टीका केली आहे.

अजित पवारांची (Ajit Pawar) ही शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर अजित पवारांचा (Ajit Pawar) पक्ष ही अस्तित्वात राहणार नाही आणि अजित पवार देखील राजकारणात नसतील, अशी टीका उत्तम जानकर यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे एकट्या पडल्या आहेत. त्यांचे सगळे नेते काढून घेतले त्याच्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता असेल तर निश्चितपणाने त्यांना त्याचा फायदा होईल. भाजपकडून मी दुखावलं गेलो होतो, त्यामुळे अजित पवारांकडे गेलो. आम्ही समाजाची फसवणूक केली का? हे मतदान झाल्यानंतर तुम्हाला कळेल, असं जानकर म्हणालेत.

आमच्या तालुक्यातून एक लाखापेक्षा जास्त लीड मोहिते पाटलांना मिळेल. शरद पवार संकट असताना त्यांना मदतीचा हात देणं गरजेची गोष्ट होती, असंही जानकर यांनी म्हटलंय.

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला धक्का

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठे धक्के बसले आहेत. पहिले मोहिते पाटलांचं संपूर्ण घर भाजपला सोडून गेलं. त्यानंतर भाजपने मोहिते पाटलांचे विरोधक उत्तम जानकर यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपचे प्रयत्न अपयशी ठरले. मोहिते पाटलांना उत्तम जानकरांचं मन वळवण्यात यश आलं. लोकसभा निवडणुकीत उत्तम जानकर मोहिते पाटलांना मदत करतील. त्यानंतर विधानसभेला मोहिते पाटील उत्तम जानकरांना मदत करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या माढा लोकसभा मतदारसंघातील अडचणी वाढताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाचा झटका!

चिन्मय मांडलेकरच्या निर्णयाने दिग्पाल लांजेकरांचं नुकसान?, नव्या चित्रपटाबद्दल थेट बोलले…

‘पूर्ण बरे होऊनच परत या…’; ‘या’ नेत्याने भरला संजय राऊतांचा मनोरूग्णालयाचा फॉर्म

‘देशात मोदींच्या रुपाने नवीन पुतीन तयार होतोय…’; शरद पवारांची मोदींवर टीका

लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल बिनविरोध, भाजपचे दलाल विजयी!