‘पूर्ण बरे होऊनच परत या…’; ‘या’ नेत्याने भरला संजय राऊतांचा मनोरूग्णालयाचा फॉर्म

Sanjay Raut | राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. आतापर्यंत आरोप प्रत्यारोपापर्यंत ठिक होतं. मात्र आता एका नेत्यानं भलतीच भूमिका घेतली आहे. मनसेच्या एका नेत्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्याचा मनोरुग्णालयाचा फॉर्म भरलाय.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे नेहमी त्यांच्या वक्तव्यासाठी चर्चेत असतात. मात्र आता ते वेगळ्याच कारणाने चर्चेत आलेत. ते नेहमी विरोधकांवर टीका करतात. त्यांनी नुकतंच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर खालच्या पातळीवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याचा नवनीत राणा आणि रवी राणा यांनी समाचार घेतला. दरम्यान त्यांच्यावर अनेकांनी मनोरूग्ण असल्याच्या टीका देखील केल्या होत्या. मात्र आता त्यांचा मनोरूग्णाचा फॉर्म भरला गेला आहे. (Sanjay Raut)

मनसेने भरला संजय राऊतांचा मनोरूग्णाचा फॉर्म

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे नेते गजानन काळे यांनी चक्क संजय राऊत (Sanjay Raut) यांचा मनोरूग्णालयात दाखल करण्याबाबत फ़ॉर्म भरलाय. त्या फॉर्मचा फोटो समोर आला आहे. त्या फॉर्ममध्ये खासदार आणि सामना यांचे हितचिंतक असल्याचं नमूद करण्यात आलं. अर्जासोबत विविध बातम्यांची कात्रणे, इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे आलेल्या सीडी पेन्ड्राईव्ह स्वरूपात देण्यात आल्यात. (Sanjay Raut)

“गेट वेल सून संजय राऊत”

“संजय ऊर्फ मनोरुग्ण राऊत यांची काही दिवसातील विधान पाहता यांना मनोरुग्णालाय दाखल करणं गरजेच आहे. कधी त्यांना पवार साहेब या देशाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार वाटतात. कधी राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार वाटतात. उद्धवजी पंतप्रधान पदाचे उमेदवार का असू शकत नाही? असं बोलतात. मनसेच्या वतीने पुणे येरवडा येथे असलेल्या मनोरूग्णालयात संजय राऊत यांना दाखल करण्यासाठी त्यांचा एडमिशन फॉर्म भरण्यात आला आहे, असं गजानन काळे यांनी म्हटलंय. गेट वेल सून”, असं देखील म्हटलं आहे.

अॅडमिट होऊन पूर्ण बरे होऊन, उपचार घेऊन परत यावे…काळजी घ्या, असं सुद्धा ते म्हणालेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत बेताल वक्तव्य करत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे. काही दिवसांआधी त्यांनी अमरावतीमध्ये भाषण करत असताना नवनीत राणा यांच्यावर टीका केली. नाची, बबली म्हणत संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर खालच्या पातळीत टीका केली होती.

संजय राऊत यांनी कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ केली होती. त्यांचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. सध्या लोकसभा निवडणूक सुरू असताना. ते बेताल वक्तव्य करत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.

News Title – Sanjay Raut Filling His Mental Hospital Form By Gajanan Kale MNS Leader

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे गटाचं टेंशन वाढलं, ‘या’ नेत्याच्या घोषणेमुळे छ. संभाजीनगर मतदारसंघात ट्विस्ट

74 वर्षीय वृद्ध महिलेच्या जिवाशी खेळ, दीड तासांनंतरही रूग्णवाहिका आली नाही, अखेर….

राखी सावंतला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका!

लोकसभा निवडणूकीनंतर दोन्ही पवार एकत्र येणार का?, अजित दादांनी स्पष्टच सांगितलं

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘या’ योजना ठरतायेत लाभदायक; मिळतोय भरघोस व्याजदर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .