74 वर्षीय वृद्ध महिलेच्या जिवाशी खेळ, दीड तासांनंतरही रूग्णवाहिका आली नाही, अखेर….

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai News । राज्य सरकारने राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी रूग्णवाहिकेची सोय केली. याचा फायदा हा सामान्य जनता आणि रूग्णांना व्हावा असा त्याचा मुख्य हेतू आहे. यामुळे ऐनवेळी रूग्णांना अतिदक्षतेच्या काळात रूग्णवाहिकेचा फायदा होतो. मात्र मुंबईतील (Mumbai News) घाटकोपर येथे भलतंच घडलं. एका 74 वर्षाच्या वृद्ध महिलेला श्वास घ्यायला त्रास झाला. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकाने  रूग्णवाहिकेच्या क्रमांकावर संपर्क केला असता. दीड तास उलटून गेले तरीही रूग्णवाहिका आली नाही. (Mumbai News)

रूग्णांसाठी राज्य सरकारने रूग्णवाहिकेची सोय केली होती. मात्र या रूग्णवाहिकेचा फारसा फायदा झाला नसल्याचा घडलेल्या प्रकारावरून माहिती समोर आलीये. घाटकोपरच्या पूर्वेकडील भागात हा धक्कादायक प्रकार घडला. फोन करूनही तब्बल दीड तास सरकारी रूग्णवाहिका न आल्याने रूग्णांची दीड तास कोंडी झाली. (Mumbai News )

काय घडलं नेमकं?

घाटकोपरमधील पूर्वेकडील पटेल चौक परिसरात राहणाऱ्या शोभा रनकोटला यांना याचा नुकताच अनुभव आला आहे. शोभा यांना मधुमेह असून त्यांना गँगरीनचा त्रास आहे. यामुळे त्यांचा एक पाय काढण्यात आला. त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला. त्यामुळे त्यांच्या जावयाने फोन करून 108 क्रमांकाची रूग्णवाहिका बोलावण्यासाठी संपर्क साधला होता. रूग्णावाहिका पाठवली असं सांगून तब्बल दीड तास रूग्णवाहिका आली नाही. (Mumbai News)

त्यानंतर रूग्णाचा मुलगा आणि जावयाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिव आरोग्य सेनेचे मुंबई समन्वयक प्रकाश वाणी यांना संपर्क केला आणि घडलेला प्रकास सांगितला. त्यावेळी प्रकाश वाणी आणि त्यांच्या सहकार्याने रूग्णाच्या घरी जात रूग्ण शोभा यांना स्वखर्चाने राजावाडी रूग्णालयामध्ये दाखल केलं. अतिदक्षता विभागात रूग्णाला दाखल करण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचले.

जनतेची दिशाभूल

108 क्रमांकाची रूग्णवाहिकेची सेवा देणारे कर्मचारी खोटी माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. याची गंभीर दखल सरकारने घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिव आरोग्य सेनेचे मुंबई समन्वयक प्रकाश वाणी यांनी केली.

News Title – Mumbai News About 74 Years Old Lady Was ill Shivsena Aarogya Seva Help And Save Her Problem

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात काँग्रेसला धक्क्यावर धक्के; आणखी एका नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

नारायण राणे सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा आला समोर

‘छत्रपती शिवरायांची क्षमा मागून…’; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

उष्माघाताची बातमी वाचताना अँकर स्वतःच कोसळली, Video होतोय व्हायरल

खडसेंच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले ‘इच्छा नसतानाही…’